शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून युरिया खताचा वारेमाप वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:25 IST

सोयाबीन, मूग, उडीद पिकाला दुसऱ्या मात्रेची गरज नसल्याचा कृषी विभागाचा सल्ला

ठळक मुद्देविक्री अहवालावरून निष्कर्ष 

बीड : खतांच्या विक्री अहवालानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा विशेषत: युरियाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. शास्त्रीय दृष्टीने गरज नसताना अनेक शेतकरी वारेमाप वापर करत असल्याने त्याचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सजग केले असून युरियाचा वारेमाप वापर करु नये असे आवाहन केले.

सोयाबीन, मुग व उडीद पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे या पिकांच्या मुळांशी नैसर्गिक गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेऊन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे या पिकांना युरियाची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सद्यस्थिीमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर कृषी निविष्ठा खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे..

युरियाच्या अतिवापराचा असाही धोकाजिल्ह्यात शेतकरी पेरणीनंतर 30 ते 40  दिवसांनी परत युरिया देताना दिसत आहे. ही शास्त्रीयदृष्ट्या चुकीची पध्दत असून त्यामुळे पिकांची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते.1अतिवापरामुळे फुले व फळधारणा कमी होऊन व मुळांवरील गाठी निष्क्रीय होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे नैसर्गिक नत्र उपलब्ध होत असुनही परत नत्रयुक्त खते दिल्याने खतांवरील खर्चही वाढतो. 2 हिरवेगार पीक किडींना आकर्षित करतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचा खंड पडल्यावर त्या परिस्थितीत पिकांवर ताण पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद व पालाश खतांचा संतुलित व जमिन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीच्या मात्रेनुसार खते द्यावीत. 3पिकांना कोणतेही खत फेकून देऊ नये. खत पिकांच्या मुळाशी, मातीच्या आड, डवऱ्याच्या मागे घ्यावे. खत फेकून दिल्यास हवेमुळे ते उडून जाते व पाऊस पडल्यानंतर ते वाहून जाते. त्याचा फायदा पिकाला होत नाही.

शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहेत. खते खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांवर अनावश्यक गर्दी करु नये तसेच खतांचा साठा करुन ठेवू नये. खरीप हंगामातील सोयाबीन, मुग आणि उडीद पिकाला युरियाच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता नसून शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये - एस. एम. साळवे, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती