शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्य सेवेसाठी ‘आनापान’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:33 IST

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे.

ठळक मुद्देजागतिक आरोग्य संस्थेचा संकल्प : आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आनापान साधनेचा उपक्रम राबविण्याची सूचना

बीड : यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे. सर्वांना आरोग्य देण्याआधी सर्वांना उचित व योग्य आरोग्य सेवा देण्याचा हा संकल्प असून या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मन संतुलित राखण्यासाठी आनापान साधना उपक्रम राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त धकाधकीच्या जीवनात उद्भवणाºया आजारांकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सर्व जीवनशैलीचे आजार असल्याने वर्तणुकीत बदल होणे आवश्यक आहे. आहार आणि विहारात बदल करुन अतिरक्तदाब, मधुमेह, स्थौल्य आदी कारणांमुळे होणारे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचे आजार टाळू शकतो. आजार टाळण्यासाठी व्यायाम किंवा योगा करणे, ध्यान करणे आवश्यक आहे. तसेच साखर, मीठ, तंबाखु, दारु, शीतपेय टाळणे महत्वाचे आहे. बदलत्या लाईफस्टाईलमध्ये रुग्णांना शिस्त लावता येत नसल्याने आरोग्य विभागाने आता प्राथमिक आरोग्य उपचारावर भर देण्याचा संकल्प केला आहे.रुग्णांना सुधारताना स्वत: ला संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवेच्या तत्वांचे पालन करणाºया बाबींवर आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांना लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जनतेला पुरेशी आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषत: दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबरच डॉक्टरांना निवासी सोय उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती आहेत. काही बांधकाम प्रगतीपथावर आहे. तेथे डॉक्टर व कर्मचाºयांना निवास व्यवस्था करुन ग्रामीण रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.आनापानचा अनुभव रुग्ण, नातेवाईकांना द्याश्वास प्रश्वासावर फक्त नियंत्रण ठेवणे, सर्वांना स्वीकाराह्य असणारे सोपे, स्वस्त परवडणारे, उपलब्ध असणारे हे आनापान आहे. आपण आपलाच श्वास बघायचाय मग एकदा सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना ते आले की रुग्ण व नातेवाईकांनाही त्याचा अनुभव घ्यायला लावून सार्वत्रिक आरोग्य सेवेत याचा उपयोग करता येणार आहे.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना