लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. माजलगाव धरणाच्या काडी वडगाव येथील बॅक वॉटर आणि अमृत अटल योजनेच्या पाहणी दौºयानंतर ते बोलत होते.शहराला पाणीपुरवठा होणाºया माजलगाव धरणातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून काटकसरीने वापरावे लागेल, असे क्षीरसागर म्हणाले. परतीचा पाऊस पडण्याची आशा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर बीडकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी जलसाठ्यांवर रसायन पसरवण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, २०१९ पूर्वी ही योजना पूर्ण होणार आहे. अमृत अटल योजनेमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समांतरचे व संपूर्ण शहरातील पाईप एचडीपी हे नवीन तंत्रज्ञान असलेले असणार आहे. त्याचे आयुष्यमान ७० वर्षापुढे असेल. २०५२ ची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, किरण देशमुख, नायब तहसीलदार खिल्लारे, महाराष्ट्र राज्य प्राधीकरणचे प्रशांत भांबरे, मुखीद लाला, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने, विकास जोगदंड, विलास बडगे, विनोद मुळीक, दिलीप गोरे, राणा चौहाण आदी उपस्थित होते.बिंदुसरेत उड्या मारुन विकास होत नाहीयावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील कोल्हारवाडी ते आनंदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते काम लवकरच सुरु होईल.बार्शी नाक्याहून वडवणीकडे जाताना असलेल्या बायपासवर पादचाºयांच्या वाहतुकीसाठी दोन पूल मंजूर करण्यात आले आहेत.यासह इतर मोठ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, आम्ही ही सर्व कामे मंजूर करुन घेताना, काही जण बिंदुसरेत उड्या मारत होते, असा टोला विरोधकांचे नाव न घेता क्षीरसागरांनी लगावला.
अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:44 IST
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जलसाठ्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी रसायनप्रयोग करा, पाणी काटकसरीने वापरा