शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल अमेरिकन प्रशासनास कौतूक : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:35 IST

मोठी लोकसंख्या आणि भू-क्षेत्र असलेल्या भारताच्या प्रशासकीय सेवा आणि अंमलबजावणीबद्दल अमेरिकन अभ्यासकांमध्ये प्रचंड कौतूक आहे. अवाढव्य लोकसंख्या आणि क्षेत्र असूनही देशपातळीवर पोलिओ, रुबेला लस, निवडणूक प्रणाली आणि यासारख्या इतर योजना, मोहिमा भारतीय प्रशासनातर्फे सहजपणे कशा राबविल्या जातात, याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा करून आश्चर्य व्यक्त केले, असे बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देन्युयॉर्क येथील अभ्यास दौरा : सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड; ‘लोकमत’शी केली चर्चा

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोठी लोकसंख्या आणि भू-क्षेत्र असलेल्या भारताच्या प्रशासकीय सेवा आणि अंमलबजावणीबद्दल अमेरिकन अभ्यासकांमध्ये प्रचंड कौतूक आहे. अवाढव्य लोकसंख्या आणि क्षेत्र असूनही देशपातळीवर पोलिओ, रुबेला लस, निवडणूक प्रणाली आणि यासारख्या इतर योजना, मोहिमा भारतीय प्रशासनातर्फे सहजपणे कशा राबविल्या जातात, याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा करून आश्चर्य व्यक्त केले, असे बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राष्टÑीय पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्याचा संपूर्ण देशात प्रथम क्रमांक आला होता. याबद्दल जिल्हाधिकारी सिंग यांचा काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत सत्कार झाला होता. याच योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या त्यांच्या सोबतच्या देशातील सात जिल्हाधिकारी यांना केंद्र शासनातर्फे अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी पाठविले होते. शंभर वर्षांचा इतिहास असलेले आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जगात अव्वल असलेल्या न्युयॉर्कमधील मॅक्सवेल सिराक्यूस युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासासाठी सिंह यांची निवड झाली होती. आठ दिवसांच्या आपल्या वास्तव्यात त्यांनी अमेरिका आणि भारत यांची प्रशासकीय सेवा, निर्णय, अंमलबजावणी, नियम, उपायोजना, कायदे आदि संदर्भात तुलनात्मक अभ्यास केला.अमेरिकेतील विविध संस्था, संघटना, कंपन्यांना भेटी देऊन त्यांची कार्यप्रणाली समजून घेतली. तेथील अभ्यासक अमेरिकन प्रशासकीय सेवेवर पाहिजे तेवढे खूष नाहीत तर त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल खूप आदर आहे. या युनिव्हर्सिटीचे डीन तब्बल ७५ वेळा भारतात अभ्यासासाठी आले होते. एवढ्या मोठ्या अवाढव्य भारत देशात सर्वकाही सुरळीत चालू असते, अशा प्रतिक्रिया त्यांच्याशी चर्चा करताना ऐकावयास मिळाल्या, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड