कोरोना संक्रमणकाळात ग्रामीण भागातील रुग्णांना येणा-या अडचणींची दखल घेत महाधन कंपनीतर्फे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
कंपनी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश देशमुख यांच्या पाठपुराव्याने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून ही रुग्णवाहिका भेट दिली. सदर रुग्णवाहिका रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे खते डिलर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांच्या हस्ते शनिवारी सुपूर्द करण्यात आली. यावेळी कंपनीचे महाव्यवस्थापक शहणमं भिसे, विभागीय विक्री व्यवस्थापक सचिन गोळेकर, वरिष्ठ व्यवस्थापक आझम शाह, विभागीय विपणन व्यवस्थापक संतोष कदम, जगदीश मंत्री, हरिभाऊ केंद्रे, बाळासाहेब ठोंबरे, प्रेम मुथा, माधव दहिफळे, रवींद्र मुंदडा, अशोक तापडे संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
260621\img-20210626-wa0133_14.jpg