शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या अंबाजोगाईच्या महिलेस पुणे पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST

अंबाजोगाई : गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली ...

अंबाजोगाई : गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बाळ पळवून नेल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी चाकण येथे घडली होती.

राणी शिवाजी यादव (वय २८, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, जि. बीड), असे आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी राजेंद्र नागपुरे व त्यांची पत्नी हे दाम्पत्य अपहृत बाळाचे जन्मदाते नाहीत, ही बाबसुद्धा तपासात समोर आली.

धनश्री राजेंद्र नागपुरे (वय चार महिने) असे चिमुकलीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय ५३, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली होती. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी आरोपी महिला १७ फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर नागपुरे यांची मुलगी धनश्री हिला घरातून घेऊन निघून गेली. याबाबत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी १०० सीसी कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. बाळाचे अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती; मात्र गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय बळावल्याने आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी महिलेला पोलिसांनी अंबेजोगाई येथून चार महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता, तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.

बाळाचे जन्मदाते वेगळेच

फिर्यादी राजेंद्र नागपुरे व त्यांची पत्नी हे दाम्पत्य अपहृत बाळाचे जन्मदाते नाहीत, ही बाब तपासात समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने नागपुरे दाम्पत्याच्या नावाचा वापर करून चाकण येथील एका दवाखान्यात बाळाला जन्म घातला. त्यानंतर नागपुरे यांना ते बाळ देऊन टाकले. बाळाचा सांभाळ करत असले तरी नागपुरे हे त्याचे जन्मदाते नसून, अन्य जोडपे असल्याचे समोर आले.

बाळाला सांभाळण्याचा केला बहाणा

आरोपी राणी हिचा गर्भपात झाला; मात्र त्याबाबत घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तिला एक नवजात बाळ पाहिजे होते. दरम्यान, नागपुरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेच्या शोधात होते. याबाबत आरोपी राणी हिला माहिती मिळाली. बाळाला सांभाळण्याच्या बहाण्याने नागपुरे यांच्याकडे आल्यानंतर चार महिन्यांच्या धनश्री हिला घेऊन ती पळून गेली.