शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईच्या सुपुत्राची भरारी; सिंगापूरमध्ये ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’ चित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:39 IST

विदेशी चित्ररसिकांसमोर कुंचल्यातून साकारला भारतीय संस्कृतीचा ठेवा 

ठळक मुद्देमेक इन इंडिया, वारसा संस्कृतीचारंगांची उधळण, प्रभावी चित्रकृती

- अनिल भंडारी

बीड : बीड जिल्ह्यातील संदीप छत्रबंध सध्या सिंगापूरच्या प्रदर्शनात भारतीय संस्कृतीचा ठेवा चित्र  रसिकांसमोर आपल्या कुंचल्यातून साकारत आहेत. ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’च्या वतीने सिंगापूरच्या आर्ट गॅलरी प्रदर्शनासाठी त्यांच्या निसर्गचित्रांची निवड झाली आहे. २६ जुलैस सुरू झालेल्या प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली.

कला, शिक्षणाची नगरी अंबाजोगाईतून  कलाशिक्षणाचा प्रवास सुरु करणाऱ्या संदीप यांनी चित्रकलेचे पुढील शिक्षण पुणे, मुंबईत पूर्ण केले. ५-७ वर्षांपासून ते पुण्यात आपल्या कलेला नवे आयाम देत आहेत.  वॉटरकलर माध्यमातील अमेरिकेचे अ‍ॅवॉर्ड  त्यांना  मिळालेले आहे. नंतर पुढे क्रिएटिव्ह निसर्गचित्रे कॅनव्हासवर चितारणे सुरू केले. यात मुख्य रस्ते, त्या ठिकाणचे वातावरण दर्शविणाऱ्या चित्रांचे संपूर्ण देशभरातील आर्ट गॅलरीतून स्वतंत्र तसेच ग्रुपच्या माध्यमातून  चित्रप्रदर्शने मांडली. मोठ्या आर्ट स्कूलमधून निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके सादर करत भावी चित्रकारांना मार्गदर्शनही केले आहे. आर्टिस्ट कॅम्पद्वारे, कॅनव्हासवर चित्रे केल्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.  त्यामुळे विदेशातही अनेक समूहांद्वारे त्यांची चित्रप्रदर्शने रसिकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. 

मेक इन इंडिया, वारसा संस्कृतीचाभारतीय संस्कृतीचे दर्शन देणारी,  २१ व्या  शतकात  सांस्कृतिक ठेवा  जोपासण्याचे  प्रभावी काम  संदीप आपल्या  चित्रातून  करत आहेत. मेक इन इंडिया, देशाची  यशस्वीता जोपासण्याचा  संदेश  चित्रातून ते देत आहेत. पौराणिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या काशी, मथुरा,  वाराणसी, येथील नदी घाटांची प्रत्यक्ष निसर्ग चित्रे अ‍ॅक्र लिक कलरच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्ट्रोकचा उपयोग करून वास्तविकतेचा अनुभव देण्याचा प्रयत्न चित्रांमधून पाहायला मिळतो. 

रंगांची उधळण, प्रभावी चित्रकृतीस्पॉटवरील भल्या पहाटेची वातावरणनिर्मिती, त्यावेळची रेलचेल, पडणारा प्रकाश, शेड, अत्यंत हळुवारपणे चित्रातून अत्यंत मोहकपणे दाखवतानाचे कसब  साकारलेले पहायला मिळतात.  फिगर क्रि एशन, फोर ग्राऊंंड, बॅकग्राऊंडमधील घरे, लाईटचे  खांब, पाठीमागील रंगसंगती  अत्यंत मोहकपणे चित्रातून दाखवताना आढळतात. निळा, केशरी, लाल, करडा, थेट काळ्या रंगाचा प्रभावी वापर चित्रांत पाहायला मिळतो.    

‘स्ट्रोक ऑफ इंडिया’च्या वतीने सिंगापूर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी निवडलेल्या पाच चित्रकारांमध्ये संदीपचा समावेश आहे. प्रदर्शनात  रसिकांसमोरच ते चित्रे काढत असतात, तसेच इंडियन स्टाईलच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत असतात. दहा वर्षांपासून बीडच्या कैलास कला निकेतनच्या माध्यमातून ते मार्गदर्शन घेत आहेत. विदेशातल्या नामांकित आर्ट गॅलरीतील त्यांच्या कलाकृती चित्रप्रेमींच्या पसंतीस नक्की उतरत आहेत. - श्रीकांत पुरी, कला अध्यापक, कैलास कलानिकेतन,बीड

टॅग्स :paintingचित्रकलाartकलाBeedबीडcultureसांस्कृतिक