शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमरसिंह पंडित, रजनी पाटील यांच्या नावांमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:40 IST

राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या ७० बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गेवराईचे राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील आणि अंबाजोगाईचे आनंदराव चव्हाण यांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या ७० बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गेवराईचे राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील आणि अंबाजोगाईचे आनंदराव चव्हाण यांची नावे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहेराज्य शिखर बँकेमध्ये २००५ ते२०१० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप आणि इतर प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्र ारी उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलीस उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवारांसह सर्वच संचालकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती दरम्यान एकीकडे पोलीस तपास सुरू असताना सक्तवसुली संचालनालय या प्रकरणामध्ये लक्ष घातले असून राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात ईडी ने लक्ष घातल्यामुळे खळबळ उडाली आहे अजित पवारांपासून सुरू झालेले हे प्रकरण आणि त्याचे कनेक्शन थेट बीड पर्यंत असून २००९ ते १५ या दरम्यान शिखर बँकेचे संचालक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित, शासकीय संचालक असणाऱ्या माजी खा. रजनी पाटील आणि त्यापूर्वी संचालक असलेले आनंदराव चव्हाण यांचेही गुन्हे दाखल झालेल्यांच्या यादीमध्ये नाव आहे. माजी आमदार पंडित यांचे नाव या प्रकरणांमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अमरसिंह पंडित यांचे बंधू बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे गेवराई मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत.बीड जिल्ह्यातील राकाँचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार रजनी पाटील यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हे दाखल केल्याने जिल्ह्यास मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Rajni Patilरजनी पाटीलAmarsingh Punditअमरसिंह पंडितBanking Sectorबँकिंग क्षेत्र