शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडून शोधाशोध; गेवराईतून पहिली उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:36 IST

बीडचे राजकारण : दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी एकही अर्ज नाही

बीड : जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी एकही अर्ज आला नाही. गेवराई आणि परळीत खाते उघडले आहे. तसेच बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक सामान्य चेहरा नसल्याने सर्वच पक्षांकडून शोधाशोध सुरू आहे, तर गेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकाची थेट उमेदवारीही जाहीर करून टाकली आहे. इतर ठिकाणीही नगराध्यक्ष पदासाठीचा सस्पेन्स कायम आहे.

जिल्ह्यात बीडसह माजलगाव, गेवराई, धारूर, परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर होताच महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवाराचा शोधाशोध सुरू झाला. सर्वच पक्षांनी दोन-दोन दिवस मुलाखती घेतल्या. त्यात चर्चापासून ते खर्चापर्यंतची सर्वच माहिती घेतली, पण अद्याप तरी गेवराईतील एक पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने अधिकृत अशी उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्या पालिकेसाठी आणि कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

गेवराईत महायुती होणे अशक्यगेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ. विजयसिंह पंडित, माजी आ. अमरसिंह पंडित आणि भाजपकडून माजी मंत्री बदामराव पंडित व बाळराजे पवार मैदानात आहेत. हे दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी त्यांच्यात युती होणे कठीण दिसत आहे. जागावाटपाचे ठरण्याआधीच माजी आ. अमरसिंह पंडित यांनी आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला. भाजपकडूनही अनेक नावांची चर्चा सुरू आहे.

पंकजा मुंडे - सुरेश धसांचे मन जुळेल का?भाजपने जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे, तर प्रमुख म्हणून आ. सुरेश धस यांची नियुक्ती केली; परंतु दोघेही अद्याप भेटलेले नाहीत. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांच्यात उघडपणे राजकीय बैठक झालेली नाही. त्यामुळे त्यांचे मन जुळेल का? हा प्रश्न आहे.

दुसऱ्या दिवशी परळी, गेवराईत अर्जउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिसाद थंड राहिला आहे. मंगळवारपर्यंत बीड, धारूर, अंबाजोगाई आणि माजलगाव या चारही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. केवळ दोन ठिकाणी नाममात्र अर्ज दाखल झाले आहेत. गेवराईत नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आला. परळीत नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आणि नगरसेवक पदासाठी दोन अर्ज दाखल झाले.

असे आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षणबीड - महिला (अनुसूचित जाती)अंबाजोगाई - पुरुष/महिला (खुला)परळी - महिला (खुला)माजलगाव - महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग)गेवराई - महिला (खुला)धारूर - पुरुष/महिला (खुला)

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Municipal Elections: Parties Scramble for Candidates; First Nomination in Gevarai.

Web Summary : Beed's municipal elections see parties searching for mayoral candidates. Gevarai's NCP (Ajit Pawar group) declared its candidate. Mahayuti faces challenges in Gevarai due to internal conflicts. Filing response is tepid, with few nominations in Parli and Gevarai.
टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूक 2024