शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मद्यपी लिपिकाचा बीड जिल्हा रूग्णालयात धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:16 IST

मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद नव्हती.शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा येथील एक व्यक्ती आपल्या आईला घेऊन जिल्हा रूग्णालयात आला होता. तपासणी झाल्यानंतर ते परत निघाले. याचवेळी एक तरूण त्यांना दुचाकीला चावी लावताना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याला पकडून पोलीस चौकीत नेले. हा चोर असावा, असा संशय त्यांचा होता. मात्र येथे चौकशी केली असता तो दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे समजले. शिवाय तो बीडमधीलच एका नामांकित महाविद्यालयात लिपिक या पदावर कार्यरत होता.मंगळवारी सुटी मारून तो मद्यपान करून इतरत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित दुचाकी मालकालाही हा चोर नसल्याची खात्री पटल्यावर त्याने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.महाविद्यालय प्रशासनाची धावपळहा तरूण दारू पिण्याच्या सवयीचा आहे. याच सवयीमुळे त्याच्यावर यापुर्वीही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तो मंगळवारी महाविद्यालयात आलाच नसल्याचे सांगितले. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून कारवाई करणार असल्याचे म्हटले.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड