फोटो
लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावात पाण्याच्या ताळेबंदानुसार मृदा व जलसंधारणाची कामे करण्यासाठी संरक्षित सिंचन, शेती उपयोगी अवजारे, पाण्याचा वापर, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, वैयक्तिक लाभाच्या योजना आदींबाबतचे नियोजन करण्यासाठी दत्तात्रय मुळे, उपक्रम अधिकारी शरद शिनगारे, तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर , प्रकल्प सहाय्यक प्रताप मुंडे, आर. डी. बर्वे, सुरेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला. ग्रामस्थांनी सूक्ष्म नियोजन संदर्भातील बाबी, जलमृदा व संधारणाचे महत्त्व समजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोखरा प्रकल्पांतर्गत येणार्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सूर्यकांत माने, प्रकल्प समन्वयक शिव प्रसाद येळकर, सुशांत धावरे, दशरथ उबाळे, ए. ए. तट यांनी केले.
कार्यक्रमाला तलाठी आर. जे. ननावरे, पशुवैद्यकीय अधिकारी पी. आर. धनवे, ग्रामसेवक लाखे, मुख्याध्यापक राजेसाहेब सरदेशमुख, उपसरपंच अश्विनी पवार, अप्पाराव तारळकर, गणेश पवार, रोहित माचवे, आकाश तारळकर, पांडुरंग माने, मुकुंद शिंदे, शंकर माने, मोहन पवार, हनुमंत मानेंसह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
-------
लोकसहभागातून होणार कामे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थांच्या मदतीने गावात प्रभातफेरी काढून लोकसहभागासाठी जनजागृती करण्यात आली. हनुमान मंदिरासमोर बचतगटाच्या महिलांनी गावचा नकाशा काढून गावातील उपलब्ध संसाधनांबाबत चर्चा केली. तर आराखड्याचे नियोजन केल्यानंतर शिवार फेरी काढण्यात आली.