शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:11 IST

कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.येथील दसरा मैदानावर ६ डिसेंबर पासून स्व. कृषीरत्न गणेशराव बेदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासन कृषी, पणन विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी शेतकरी युवती संघटनेच्या पूजा मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे, दादासाहेब मुंडे, अ‍ॅड.सुरेश हात्ते, काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, महादेव धांडे, सुनील नागरगोजे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. त्याचबरोबर शेतक-यांच्या घामाला व त्याच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांचा स्वाभिमान जगला पाहिजे अशी भूमिका आपण काँग्रेसच्या माध्यमातून उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कृषी प्रदर्शनातून शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करत आहे. हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडणारे असून उपाययोजना मात्र शून्य असल्याने जनतेतून सरकारविरोधात प्रचंड संताप आहे असे पटोले यांनी सांगितले.याप्रसंगी पूजा मोरे, अमर खानापुरे यांची देखील भाषणे झाली.दरम्यान कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया गिरीश थावरे, विष्णू जायभाये, इंजि. पी. आर. देशमुख, राजेंद्र जाधव, गोकुळ मेघारे, आतिष गरड, सीताराम मस्के आदी शेतक-यांचा स्व.गणेशराव बेदरे कृषीरत्न पुरस्कार खा. नाना पटोले व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महेश बेदरे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव चाटे यांनी केले.भाजप शेतकरीविरोधी : पटोलेभाजप सरकार हे घात करणारे असून, यांनी पक्षात एकनाथ खडसे यांचा घात केला. तसेच स्व.गोपीनाथ मुंडे यांचा देखील यांनीच घात केल्याची टीका खा. नाना पटोले यांनी केली. तसेच शेतक-यांसाठी काम करणारे, त्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारे हे सरकारचे दुश्मन आहेत. सत्तेत आल्यानंतर शेतक-यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना, शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याऐवजी शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेत आहे. यामुळे मी माझा खासदारकीचा राजीनामा फेकला, असे ते म्हणाले. शेतकरी विरोधी धोरणामुळे कृषी प्रधान देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते नक्कीच माझ्यासोबत राहिले असते, असे सांगतानाच बाकी का राहत नाहीत, असा प्रश्न खा.पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNana Patoleनाना पटोले