शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व सोशल डिस्टसिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तविली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तविली जात आहे. हाच धागा पकडून बीडच्या व्यापारी, उद्योजकांशी संवाद साधला. त्यांनी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नसल्याचे सांगत सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करून मास्क व सोशल डिस्टन्स ठेवणे हाच पर्याय असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८ हजर ४४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पैकी १ लाख ९० हजार ३३ अहवाल निगेटिव्ह आले आहे तर १८ हजार ४१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यातील १७ हजार ५४५ कोरोनामुक्त झाले असून ५७३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. परंतु आगोदरच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय हालही झाले. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी प्रशासनाने जनजागृती करावी, असे सांगितले.

काळजी घ्या, धोका वाढताेय

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपासून तर नव्या रुग्णसंख्येने अर्धशतक ओलांडले आहे. यावरून कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे डीएचओ डॉ.आर.बी. पवार म्हणाले.

व्यापारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात....

लॉकडाऊन हा १०० टक्के पर्याय असूच शकत नाही. मास्क व सोशल डिस्टन्स ठेवणे, स्वत:ची आणि कुटुबाची काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेतही मुलांची काळजी घ्यावी.

- अरविंद पाटील

व्यापारी बीड

लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हे पर्याय प्रभावी ठरत नाहीत. आधीच संपूर्ण वर्ष व्यापार क्षेत्रासाठी अडचणीचे ठरलेले आहे. पुन्हा लॉकडाऊन करणे चुकीचे वाटते. जनतेने काळजी घेणे महत्त्वाचे.

- भास्कर गायकवाड

व्यापारी, बीड शहर

लॉकडाऊनमुळे आगोदरच लोक सफर झाले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करू नये. केवळ काळजी घ्यावी आणि घ्यायला सांगावी, एवढेच प्रशासनाने आवाहन करावे.

- जयकिशोर बियाणी

उद्योजक, बीड