शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये धारदार शस्त्राने तरूणाचा खून, संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटवले

By सोमनाथ खताळ | Updated: April 23, 2024 22:26 IST

केजच्या क्रांतिनगर भागातील घटना

केज (जि.बीड) : येथील क्रांतिनगर  भागातील गोरख महावीर हजारे (वय १७ वर्षे) या तरुणाच्या गळ्यावर  धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली. 

हल्ला झाल्यानंतर जखमी गोरख हजारे या तरुणास काही युवकांनी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले होते, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच  पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन  व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.

सर्व नातेवाईक व नागरिकांना त्यांनी शांततेचे आवाहन करून, आरोपीला तातडीने अटक करण्यात येऊन कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मयत तरुणाचे नातेवाईक व नागरिक हे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने अटक करावे, यासाठी जमा झाले होते. हल्ला कोणी आणि का केला, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, संतप्त जमावाने सनी उर्फ अजिंक्य शामराव लांडगे याच्यावर संशय घेत रात्री उशिरा त्याचे घर पेटवून दिले.

टॅग्स :kaij-acकेजBeedबीडCrime Newsगुन्हेगारी