शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यानंतर आता शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी

By सोमनाथ खताळ | Updated: April 6, 2024 17:15 IST

बीड ग्रामीण ठाण्यातील प्रकार : जखमीने छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयातून पाठविला जबाब

बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह ११ जणांविरोधात शुक्रवारी रात्री बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी सकाळीच दुसऱ्या गटाच्या एकाने छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयातून जबाब थेट बीड ग्रामीण पोलिसांना पाठविला. यातही ज्ञानेश्वर खांडेसह कट रचल्याप्रकरणी काही राजकीय लोकांची नावे आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठाण्यात लोकांनी गर्दी केली होती. परंतू याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

ज्ञानेश्वर खांडे (रा.म्हाळसजवळा ता.बीड) यांना बुधवारी सायंकाळी गावी जाताना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे, नामदेव हरिभाऊ खांडे, गोरख ऊर्फ पप्पू शिंदे यांच्यावर कट रचला म्हणून, तर सुनील पाटोळे, बाबा रतन पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला धुनगव व इतर तीन जणांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळीच दुसऱ्या गटातील श्रीमंत प्रल्हाद डोळस (वय ३८ रा.म्हाळसजवळा ता.बीड) यांनीही छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात पोलिसांना जबाब दिला आहे. यात त्यांनी ज्ञानेश्वर खांडे यांच्यासह इतर १३ जणांची नावे घेतली आहेत. 

विशेष म्हणजे, डोळस यांनीही कट रचल्याप्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यासह त्यांच्या दोन भावांची नावे घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, यासाठीच म्हाळसजवळा गावातील शेकडो लोक बीड ग्रामीण ठाण्यात आले होते. शनिवारी सकाळपासूनच त्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत ठाण्यात गर्दी केली. परंतू शनिवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

बीड ग्रामीण पोलिसांकडून दुजाभावज्ञानेश्वर खांडे आणि श्रीमंत डोळस यांच्या तक्रारींमध्ये राजकीय लोकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शिवसेनेचेच आहेत. ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत तातडीने जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. आता दुसऱ्या गटानेही जबाब दिल्यानंतरही चौकशीच्या नावाखाली तो प्रलंबित ठेवला जात आहे. बीड ग्रामीण पोलिस हे कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आराेप ठाण्यात जमलेल्या लोकांनी केला आहे. त्यामुळे येथील ठाणेदार शिवाजी बंटेवाड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

चौकशी करून पुढील कारवाईछत्रपती संभाजीनगरहून जबाब आला आहे. परस्परविरोधी तक्रार असल्याने चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. जे लोक पोलिस ठाण्यात आले होते, त्यांना मी स्पष्टीकरण दिले आहे.- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, बीड ग्रामीण

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड