शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:39 IST

योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली.

अंबाजोगाई (बीड ) : योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली. तहसीलदार संतोष रुईकर यांनी पत्नी  कमल सोबत योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. 

१० ऑक्टोबर ते  १८ आॅक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापुजा झाली. देवल कमेटी चे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर व सौ. कमल रुईकर   यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी देवल कमिटीचे  सचिव  भगवानराव शिंदे, मुख्यपूजारी सारंग पुजारी.विश्वस्त  पृथ्वीराज साठे,कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, उल्हास पांडे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा.अशोक लोमटे, संजय भोसले,पूजा राम कुलकर्णी,गौरी जोशी,श्रीराम देशपांडे, पुरोहित,मानकरी व भाविक उपस्थित होते.  

गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दूरदूर ठिकाणाहून लोक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना विविध सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. 

देवीच्या पालखीने महोत्सवाची होणार सांगताश्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता गुरुवारी विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने पालखीचे मार्गक्रमण होणार आहे. 

दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्र्यांचे साकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणा साठी देवीला साकडे घातले. यावेळी खा. डॉ.प्रितम मुंडे,आ.संगीता ठोंबरे, गयाबाई कराड यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाई