शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:31 IST

न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या.

बीड : न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.अनिल सुनील पवार (२०, रा. शिंदेनगर, बीड) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद आहे. घटनेपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. २ फेब्रवारी न्यायालयीन तारखेसाठी त्यास न्यायालयात आणले. न्यायाधिशांसमोर हजर करून बाहेर आल्यानंतर हातकडी लावताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले होते. त्याला त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. १४ दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर शुक्रवारी पहाटे त्याला कर्नाटक राज्यात बेड्या ठोकल्या.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबरमे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, विष्णू चव्हाण, नरेंद्र बांगर, विकी सुरवसे आदींनी केली. शुक्रवारी दुपारी अनिलला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसArrestअटक