शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

चढ्या दराने खत विक्री केल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग चालू असून एप्रिल २०२१ ...

बीड : सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग चालू असून एप्रिल २०२१ पासून युरियावगळता इतर रासायनिक खतांची भाववाढ खत उत्पादक कंपन्यांनी केलेली होती. मात्र, केंद्र शासनाने अनुदानात वाढ करून खताच्या किमती नियंत्रणात आणल्या आहेत. त्यामुळे चढ्या दराने खताची विक्री केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. खतांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, समाज माध्यमातून खतांच्या किमती कमी करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली होती. याचा केंद्र शासनाने विचार करून खताच्या अनुदानात वाढ करून किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. २० मे रोजीच्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किमतीसाठी केंद्र शासनाने अनुदान देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्या दरानेच विकणे बंधनकारक आहे.

मात्र, काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापिल किमतीनुसार खते विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. ज्या खतविक्रत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे, त्यांनी सुधारित दराप्रमाणेच खते विक्री करावी आणि शेतकऱ्यांनी देखील सुधारित दरांप्रमाणेच खते खरेदी करावीत. सुधारित दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा कक्षातील मोहीम अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार करू शकता. मात्र, यासाठी ठोस पुरवा असणे गरजेचे आहे. अशा तक्रारी आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे

आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना यांच्याकडे करता येणार तक्रार

काही तक्रार असेल, तर संबंधित तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी अन्यथा जिल्हा परिषद कृषी विभागातील वाय.एस. खेडकर (७४४७२३२३९१) व जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय एस.डी. गरांडे (९४२३६९०८६४) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अ.क्र. खताचा प्रकार ग्रेड कंपनीचे नाव

इफको जयकिसान (ZuariAgro) कोरोमंडल आर.सी.एफ.

1 DAP 1200 1200 1200 -

2 10:26:26 1175 1375 1300 -

3 12:32:16 1185 1310 - -

4 20:20:0:13 975 1090 1050 -

5 19:19:19 - 1575 - -

6 28:28:00 - 1475 1450 -

7 14:35:14 - 1365 1400 -

8 24:24:0:85 - - 1500 -

9 15:15:15:09 - - 1150 -

10 16:20:0:13 - - 1000 -

11 15:15:15 - - - 1060

----------

खरिपाचे क्षेत्र अपेक्षित लागवड क्षेत्र ७ ,९१, ००० हेक्टर

-------

कृत्रिम टंचाईची शक्यता

बाजारपेठेतील खताच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून काही ठिकाणी वाढीव दराच्या छापील किमती खतांच्या गोणीवर आल्याने त्यानुसार विक्री होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर खताची कृत्रिम टंचाई करून वाढीव दराने विक्री होणार नाही यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती करत आहे.

=========