शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तालुक्यात शासकीय धान्य पकडणार्‍या ‘त्या’ दोन महिलांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 14:12 IST

गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला.तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची बदनामीही  झाली. हाच ठपका ठेवून  अ‍ॅड. संगीता धसे व संगीता चव्हाण या दोघींवर कारवाई कारण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी एन.आर. शेळके यांनी दिली.

ठळक मुद्देकुठलाही अधिकार नसताना आम्ही दक्षता समितीच्या सदस्या आहोत, असे सांगत तलवाडा येथे अ‍ॅड. धसे व चव्हाण यांनी जातेगाव, सुलतानपूर येथे जाणारा शासकीय धान्याचा टेम्पो अडविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे हाल होत असल्याची तक्रार जातेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा बुद्धभूषण वक्ते यांनी पुरवठा विभागाकडे केली होती. यामध्ये सर्वंकष चौकशी करून या दोन्ही महिलांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एन.आर. शेळके यांनी सांगितले.

बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला. तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची बदनामीही  झाली. हाच ठपका ठेवून  अ‍ॅड. संगीता धसे व संगीता चव्हाण या दोघींवर कारवाई कारण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी एन.आर. शेळके यांनी दिली.

कुठलाही अधिकार नसताना आम्ही दक्षता समितीच्या सदस्या आहोत, असे सांगत तलवाडा येथे अ‍ॅड. धसे व चव्हाण यांनी जातेगाव, सुलतानपूर येथे जाणारा शासकीय धान्याचा टेम्पो अडविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे हाल होत असल्याची तक्रार जातेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा बुद्धभूषण वक्ते यांनी पुरवठा विभागाकडे केली होती. यावर गंभीर दखल घेत पुरवठा विभागाने चौकशी लावली आहे. यामध्ये सर्वंकष चौकशी करून या दोन्ही महिलांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एन.आर. शेळके यांनी सांगितले.

त्यामुळे आता या दोघींवर दक्षता समितीचे नाव पुढे करून केलेली कारवाई चांगलीच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही वकील महिलांवर कठोर कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी गेवराई तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दुकानदारांनी दिला आहे. 

मी कामात आहे याबाबत अ‍ॅड.संगिता चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, मी आता कामात आहे. मी तुम्हाला भेटून प्रतिक्रिया देते, असे सांगितले. तर अ‍ॅड. संगीता धसे यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

टॅग्स :Beedबीड