शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

उपस्थिती नसेल तर ‘अ‍ॅक्शन’; बीडच्या नूतन सीईओंचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:09 IST

बीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन राहील, असे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन राहील, असे त्यांनी सांगितले.

मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीईओ अमोल येडगे २०१४ च्या आयएएस बॅचमधील अधिकारी असून कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. मागील नऊ महिन्यांपासून ते नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी, या पदांवर कार्यरत होते. बीड जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. बीडमध्ये काम करणे आपल्यासाठी आव्हानात्मक असून बुधवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत जि. प. च्या कामांची स्थिती व टीमभावनेतून कसे काम करायचे याबाबत सूचना दिल्या आहेत.

जि. प. च्या अंतर्गत असलेल्या शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकासासाठी प्रशासनाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील पायाभूत सुविधा, कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशासन गतीमान करण्याचे आपले व्हिजन असल्याचे ते म्हणाले.

सरप्राईज व्हिजीटने उडाली धावपळनुतन सीईओ अमोल येडगे यांनी बुधवारी सकाळी नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, खोकरमोहा जि. प. शाळा व अंगणवाडी तसेच शिरुर पं. स. ला अचानक भेटी दिल्या. गैरहजेरीबरोबरच अंतर्गत स्वच्छतेचा अभाव दिसून आला. राजुरी प्रा. आरोग्य केंद्रात ६ तर शिरुर पं. स. मध्ये गटविकास अधिकारी शशीकांत सोनवणे यांच्यासह १५ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन’ अशा शब्दात त्यांनी दांडीबहाद्दरांना इशारा दिला.

हार, बुकेऐवजी पुस्तकेनुतन सीईओ अमोल येडगे यांनी हार, बुके न स्वीकारता पुस्तकांचा स्वीकार केला. शाळांना भेट देण्यासाठी, वाचनासाठी पुस्तके कामी येतील, असे ते म्हणाले. ४० आश्रमशाळांना पुस्तके भेट दिली असून ८१ फिरते वाचनालयांना सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.