शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

वीज चोरी करणाऱ्या २५० जणांविरूद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:12 IST

माजलगाव तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणा-या जवळपास २५० जणांविरूध्द कारवाई केली आहे.

ठळक मुद्देआकडे टाकून वीज चोरी करणे भोवले : महावितरण विभाग माजलगावच्या पथकाची तीन गावांत मोठी कारवाई

माजलगाव : माजलगाव शहरासह तालुक्यामध्ये वीजचोरीचे प्रमाण वरचेवर वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत आहे. ही वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण माजलगावच्या वतीने शुक्र वारी सकाळपासून माजलगाव तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणा-या जवळपास २५० जणांविरूध्द कारवाई केली आहे.माजलगाव शहराची लोकसंख्या ही जवळपास लाखाच्या घरात जाते. त्याचबरोबर छोटेमोठे व्यवसाय ही हजाराजवळ आहेत. यामुळे विजेशिवाय एकही व्यवसाय असो वा घरगुती हा विजेशिवाय चालूच शकत नाही. एवढी मोठी लोकसंख्या अन एवढे मोठे व्यवसाय असताना देखील केवळ घरगुती, व्यवसाय, जिनींग आदींना फक्त ६ हजार ५०० वीज ग्राहक आहेत. तालुक्यात देखील असे मिळून १२ हजार ५०० वीज ग्राहक आहेत. महावितरणच्या आशीर्वादाने कसलीच करवाई अथवा उपाययोजना होत नसल्याने सर्रास आकडे टाकून, मिटरमध्ये छेडछाड केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरी ही होत आहे. होणारी वीज चोरी रोखण्यासाठी येथील महावितरणचे अधिकारी हे दुर्लक्ष करीत असतात. परंतु परिणामी वीज चोरी, वीजगळती प्रमाण ५० टक्क्यापर्यंत पोहचले आहे आणि वीज बिल हे अनेकजण भरत नसल्याने तालुक्यात आज जवळपास ९ कोटी ५० लाख रु पये थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे. वारंवार सांगून ही कसलीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे वसुली ही कमी झाली आहे आणि आकडे टाकून वीज घेतल्यामुळे हमखास रोहित्रात बिघाड होत आहे. परिणामी वीज चोरी करणाºयामुळे मीटर असलेल्या ग्राहकांना नाहक त्रास होत असून, एकदा रोहित्र बिघडल की पंधरा-पंधरा दिवस गावे अंधारात राहतात. यामुळे महावितरण विभाग माजलगावच्या वतीने शुक्र वारी ही मोठी कारवाई केली असून, राष्ट्रीय महामार्गावरील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणाºया जवळपास २५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पथकांमध्ये उपविभागीय अभियंता सुहास मिसाळ यांच्यासह, कनिष्ठ अभियंता चेतन चौधरी, मयूर अमरे, प्रताप इंगळे सहायक अभियंता व सर्व ४० लाइनमन कर्मचारी सहभागी होते.या वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचे उपकार्यकरी अधिकारी सुहास मिसळ यांनी सांगितले. तसेच ही कारवाई चालू राहणार असून, शहरासह तालुक्यातील प्रत्यक गावात ही मोहीम राबवली जाणार आहे.

टॅग्स :Beedबीडelectricityवीजtheftचोरी