शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याला लुटणारा अर्ध्या तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:13 IST

मोंढा भागामधून व्यापा-याची बॅग लुटून पळून जाणा-या दोघांपैकी एकाला अर्ध्या तासातच जेरबंद करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरातील मोंढा भागामधून व्यापा-याची बॅग लुटून पळून जाणा-या दोघांपैकी एकाला अर्ध्या तासातच जेरबंद करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली. बॅग आणि त्यातील रोख रक्कमही सुरक्षित राहिली.येथील संजय मुलचंद अब्बड यांचा किराणा आणि तेलाचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास दुकान बंद करुन बॅग घेऊन घरी निघाले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अब्बड यांची बॅग हिसकावली. यामध्ये १ लाख ८३ हजार रुपये होते. हा प्रकार घडताच अब्बड यांनी आरडाओरडा केला. तसेच पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तसेच रविवारी झालेल्या चोरीच्या घटनेप्रकरणी तपासासाठी गेलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल धस, माजलगावचे एएसआय पवार आणि सहका-यांनी नियोजन करुन शहरात नाकाबंदी केली. अर्ध्या तासातच इदगाह रोड भागात सोन्या उर्फ केदारनाथ नागूराव दराडे (वय २७, रा. फुलेनगर) याला बॅगसह ताब्यात घेण्यात आले. त्याचा सहकारी मात्र पसार झाला. त्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी संजय अब्बड यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.लुटीनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलविली. नागरिकांनीही सहकार्य केले. त्यामुळे अर्ध्या तासात आरोपीला बॅग व रकमेसह पकडण्यात यश आले.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक