शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की घातपात ? बीडमध्ये बसस्थानकात आढळला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:23 IST

रविवारी मध्यरात्री येथील बसस्थानकात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्यावेळी हा खून असल्याचे बोलले जात होते. परंतु सकाळी याची चर्चा अपघातात झाली. त्यामुळे हा घातपात की अपघात? याबाबत शहरात चर्चेला उधान आले असून पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

बीड : रविवारी मध्यरात्री येथील बसस्थानकात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्यावेळी हा खून असल्याचे बोलले जात होते. परंतु सकाळी याची चर्चा अपघातात झाली. त्यामुळे हा घातपात की अपघात? याबाबत शहरात चर्चेला उधान आले असून पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. 

कचरू ढोले (३८ रा.बार्शी नाका, बीड) असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार ढोले हे मजूरी काम करतात. रविवारी त्यांनी मजूरी केल्यानंतर ते बसस्थानकात आले होते. परंतु ते कोणत्या कामासाठी बसस्थानकाकडे आले होते, हे अस्पष्ट आहे. ढोले यांच्या कानाच्या बाजूला मोठी जखम झाल्याचे सांगण्यात आले. परंतु ही जखम खाली पडल्याने किंवा मारहाणीतही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, माहिती समजताच रात्री अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी स्थानकात धाव घेतली. सध्या मृतदेह जिल्हा रूग्णालयात असून शवविच्छेदन केले जात आहे. ढोले यांचा घातपात झाला की अपघात झाला, याबाबत संशय असून ते शवविच्छेदन अहवालात व तपासानंतर पुढे येईल, असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

बसने उडविल्याची चर्चादरम्यान ढोले यांचा मृत्यू बसने उडविल्याने झाला, अशी चर्चा शहरभर होती. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. बसने धडक दिली असती तर ढोले यांच्या शरीरावर इतरत्रही जखमा झाल्या असत्या. परंतु त्यांच्या केवळ कानाजवळ जखम झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच खून म्हणावा तर एवढ्या छोट्या जखमेने मारण्यासाठी कुठल्या तरी धारदार शस्त्राचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. हे प्रकरण सध्या तरी गुंतागुंतीचे असून पोलीस गतीने तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड