माजलगाव : बीलाची रक्कम देण्यासाठी चक्क अधिकाºयालाच लाच मागणारे माजलगाव येथील केसापुरी वसाहतमधील जायकवाडी प्रकल्प जल नि:सारण बांधकाम उपविभाग क्र.११ मधील दोन लिपीक बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी माजलगाव येथे करण्यात आली.वरिष्ठ लिपीक सुरेश त्रिंबकराव थोरात (वय ५७) व कनिष्ठ लिपीक गणेश जीवनराव शिंदे (वय ४४) अशी पकडलेल्या दोन लिपीकांची नावे आहेत. २६ एप्रिल रोजी तक्रारदाराने दाखल केलेल्या मंजुर बिलाची रक्कम १६ हजार १२८ रूपये होती. ती देण्यासाठी या दोघांनी १२ टक्केप्रमाणे १९३५ रूपयांची लाच मागितली होती. याची खात्री करताच शुक्रवारी सापळा लावण्यात आला. दोघांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले. सुरेश थोरातने लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजानन वाघ, कल्याण राठोड, राकेश ठाकुर, सखाराम घोलप, भरत गारदे, गणेश म्हेत्रे आदींनी केली.तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे - हनपुडेनियमातील काम करण्यासाठी कोणी आपल्याकडे लाच मागत असेल तर आपण तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. नाव गोपनीय ठेवले जाते. तसेच खात्री करुन कारवाई केली जाते. तक्रारदाराने विश्वासाने पुढे यावे असे आवाहन उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी केले.
शाखा अधिकाऱ्याकडून लाच स्वीकारताना २ लिपिक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:48 IST
बीलाची रक्कम देण्यासाठी चक्क अधिकाºयालाच लाच मागणारे माजलगाव येथील केसापुरी वसाहतमधील जायकवाडी प्रकल्प जल नि:सारण बांधकाम उपविभाग क्र.११ मधील दोन लिपीक बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
शाखा अधिकाऱ्याकडून लाच स्वीकारताना २ लिपिक जाळ्यात
ठळक मुद्देजलसंधारण विभाग : बीड एसीबीची माजलगावात कारवाई