शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

लाच स्वीकारताना बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:55 IST

स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी दोन लाखांपैकी एक लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केली.

ठळक मुद्देएसीबीची कारवाई : कारकूनामार्फत स्वीकारले १ लाख १५ हजार रुपये

बीड : स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी दोन लाखांपैकी एक लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केली.

बीडमधील धानोरा रोडवरील सावित्रीबाई फुले महिला बचतगट या नावाचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानातील गैरव्यवहाराबाबत एकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याची चौकशी करुन शेळके याने दुकानाचा परवाना रद्द केला. याचाच राग मनात धरुन दुकानाच्या मालकीणीने तक्रारदारविरुद्ध शेळकेकडे तक्रार केली. याची शेळकेकडे सुनावणी सुरु होती. या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी शेळके याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने २२ डिसेंबर २०१७ रोजी बीड एसीबीकडे शेळकेविरोधात तक्रार दाखल केली. एसीबीने खात्री केली. गुरुवारी दुपारी कार्यालयातीलच लेखा परिवेक्षक बब्रूवान फड याने शासकीय विश्रामगृहाजवळ तक्रारदाराला १ लाख १५ हजार रुपये घेऊन बोलावले. एसीबीने या ठिकाणी सापळा लावला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी फडला पैशांसह रंगेहाथ पकडले. त्यानंतर फडला गाडीत बसवून जिल्हाधिकारी कार्यालयातील शेळकेच्या केबीनकडे नेले. येथे त्याने ठरल्याप्रमाणे शेळकेला पैसे दिले. शेळकेने पैसे स्वीकारताच त्यालाही कार्यालयातच ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करुन एसीबीच्या कार्यालयात आणले. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक अर्चना जाधव, दादासाहेब केदार, अशोक ढोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकूर, प्रदीप वीर, अमोल बागलाने, मनोज गदळे, सय्यद नदीम यांनी केली.

बीड, औरंगाबादमधील घरांची झडतीकारवाई होताच औरंगाबादमधील शेळकेच्या दोन्ही घरांची झडती घेण्यात आली. तसेच बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शनमधील घराची झडती घेतली. फड याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले होते.

तीन महिन्यांपासून मागावरतक्रार दाखल झाल्यापासून एसीबीचे अधिकारी व कर्मचारी शेळकेच्या मागावर होते. परंतु तो स्वत: पैसे न घेता कारकून फड मार्फत पैसे घेत होता. प्रत्यक्षात तो समोर येत नसल्याने कारवाईत अनेकवेळा अडचणी आल्या.

पंडितविरुद्धच्या तक्रारीने चर्चेतडॉ. एन. आर. शेळके याने आ. अमरसिंह पंडित, त्यांचा पी. ए. व अन्य एक खाजगी व्यक्ती आपल्याला फोनवरुन धमक्या देत असल्याची तक्रार शिवाजीनगर ठाण्यात दिली होती. या प्रकरणाने शेळके चर्चेत आला होता. त्यानंतर अवघ्या १२ तासातच शेळकेला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी आ. अमरसिंह पंडित यांनी शेळके हा भ्रष्ट अधिकारी असल्याचे पत्रक काढले होते.

जालन्यातही वादग्रस्त कार्यकाळजालना येथेही एन. आर. शेळके वादग्रस्त ठरला. सर्वसामान्यांची कामे वेळेत न करणे, अडवणूक करणे यासारख्या तक्रारी डॉ.शेळकेविरुद्ध होत्या. जमिनीच्या प्रकरणात त्याच्यावर एकदा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

शेळकेच्या बडतर्फीचेही आदेशऔरंगाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी असताना ४ जानेवारी २०१४ च्या तक्रारीनुसार डॉ. एन.आर. शेळके याची विभागीय चौकशी सुरू झाली होती. या चौकशीत सर्व दोषारोप सिद्ध होत असल्याने चौकशी अधिकाºयांचे निष्कर्ष शासनाने मान्य केले. तसेच यापुढे शासन सेवेत ठेवणे इष्ट नसल्याने महाराष्टÑ नागरी सेवा अधिनियमांतर्गत शेळके यास शासन सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांचा अवधी शेळकेला बाजू मांडण्यासाठी देण्यात आला आहे. शासनाचे सहसचिव मा.आ. गुट्टे यांच्या स्वाक्षरीने १९ मार्च रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसcollectorतहसीलदारArrestअटक