शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:00 IST

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : १२ लाख १४ हजार वारकरी १०७९ दिंड्यांत चालणार

बीड : ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठू नामाचा गजर करत राज्यातील १०७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाने नियोजन करत प्रत्येक पाच किमी अंतरावर असे २०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने स्थापन केले आहेत. तसेच ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आयसीयू स्थापन केले आहेत. २०२४ मध्ये १५ लाख लोकांना आरोग्य सेवा दिली होती. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी ५ व १९ मे रोजी बैठका झालेल्या आहेत. आता १२ जून रोजी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे याचा आढावा घेणार आहेत.

११५५ मनुष्यबळवारकऱ्यांच्या सेवेसाठी जवळपास ११५५ मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. यात १६१ विशेष तज्ज्ञ, डॉक्टर २८६ यांच्यासह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, फार्मासिस्ट आदींचा समावेश आहे.

खासगीच्या १० खाटा आरक्षितशासकीय आयसीयू, आपला दवाखाना यासोबतच पालखी मार्गावर असणाऱ्या प्रत्येक खासगी रुग्णालयातही १० खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना पुणे उपसंचालकांनी दिल्या आहेत. तसेच दिंड्यांसाेबत २९० आरोग्यदूत असणार आहेत.

बाळ खुशीत, आईच्या कुशीतपालखी सोहळ्यात आरोग्य विभागाचा एक चित्ररथ जनजागृतीसाठी असेल. तसेच सोहळ्यात कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाला टोपी, टी-शर्ट, रूमाल दिला जाणार आहे. त्यावर 'बाळ खुशीत, आईच्या कुशीत', 'स्वच्छतेशी दोस्ती, आरोग्यापासून मुक्ती', 'मुलगा-मुलगी एकसमान, दोन्ही वाढवतात कुटुंबांची शान', दोन मुले गुटगटीत, संसार आमचा सुटसुटीत, असे संदेश लिहिले आहेत. तसेच टँकर, रुग्णवाहिका यावरही संदेश लिहून जनजागृती केली जाणार आहे.

६६ जणांना अटॅक, ४२६ जणांना कुत्रा चावलादिंडीत चालत असताना अनेक वृद्धांसह इतरांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. २०२४ मध्ये अशाच १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांवर उपचार केले होते. यात ५४६७ जणांना ॲडमिट केले होते. ४९५० जणांना रेफर केले. तसेच २६६७ जणांना सारी, २४७९३ आयएलआय, १६९२८ डायरीया, ७८६० जुलाब, ४४९८२ ताप, ६६ हर्ट अटॅक, २८७ अपघातात जखमी, ४२६ कुत्रा चावला, ११ सर्पदंश इतर १४ लाख ९ हजार २८७ रुग्णांचा समावेश होता.

नावीन्यपूर्ण ठळक बाबी काय?आरोग्यदूत - २९०महिलांसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ - १५मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष - ३७दिंडी प्रमुखांसाठी औषधी किट - ३५००रुग्णवाहिका - ३३१आयसीयू कक्ष - ४६आपला दवाखाना २०३

तत्पर आरोग्य सेवापालखी सोहळ्याचे नियोजन झाले आहे. १२ जून रोजी आरोग्यमंत्री बैठक घेणार आहेत. वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना आरोग्य सेवा तत्पर मिळावी, यासाठीच 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे.- डॉ.आर.बी.पवार, उपसंचालक पुणे

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीBeedबीड