शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास

By सोमनाथ खताळ | Updated: December 20, 2023 21:30 IST

पाटोदा-परळी प्रवासादरम्यानची घटना, तक्रार देण्यासाठी पोलिसांची टोलवाटोलवी

सोमनाथ खताळ, बीड : बस प्रवासात एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन शेजारी बसली. दाम्पत्याची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील तब्बल १६ तोळे दागिने लंपास केले. ही घटना १८ डिसेंबर रोजी पाटोदा ते परळी प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणात तक्रार देण्यासाठी परळी व पाटोदा पोलिसांनी टोलवाटोलवी केली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशीकला ढाकणे (वय ५१ रा.परळी) या पती नामदेव ढाकणे यांच्यासह पुण्याहून शिवशाही बसने परळीला १८ डिसेंबर रोजी येत होत्या. त्यांची बस पाटोदा येथे दुपारी पोहचल्यानंतर एक महिला तिच्या मुलासह या बसमध्ये बसली. ही महिला प्रारंभी शशीकला ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला नामदेव ढाकणे यांच्या शेजारील दुसऱ्या सिटवर बसवले. थोड्या वेळाने ही महिला नामदेव ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला शशीकला यांच्या शेजारी बसवले. दरम्यानच्या काळात मस्साजोग येथे बस येताच ही महिला उतरुन गेली. त्या आगोदरच तिने ढाकणे यांच्या पिशवीतील सोने, चांदीचे जवळपास ५ लाख १२ हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले.

ढाकणे दाम्पत्य परळीत गेल्यानंतर त्यांना बॅगची चेन अर्धी उघडी दिसली. त्यांनी बॅग तपासल्यावर दागिने नसल्याचे समजले. त्यांनी लागलीच परळीतील संभाजीनगर व शहर पोलिसांत धाव घेतली. परंतू त्यांनी तक्रार घेण्याऐवजी पाटोद्याला जा, असा सल्ला दिला. पाटोदा पोलिसांनीही सुरूवातीला टाळाटाळ केली. परंतू यात वरिष्ठांकडे व्यथा मांडताच त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला.

टॅग्स :Robberyचोरी