शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:23 IST

११ महिन्याचा करार; डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा गाळा

- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यातील  डोंगरपिंपळा ४५०० लोकसंख्या असलेलं गांव.गावात ग्रामपंचायत ने बांधलेले चार व्यापारी गाळे. त्यातही एका गळ्यासाठी चक्क ३० लाखांची बोली.ते ही ११ महिन्यांचे भाडे.एका चहाच्या टपरीसाठी.आहे न आश्चर्य ? नव्हे वास्तव.

अंबाजोगाई तालुक्यातील  डोंगरपिंपळा ४५०० लोकसंख्या असलेलं गाव.गावची मतदार संख्या २३०० च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत ४ व्यापारी गाळे १० बाय १० आकाराचे बांधण्यात आले आहेत.हे गाळे ग्रामपंचायत ने ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत.या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स,सलून अशी दुकाने आहेत.आज सोमवारी ग्रामपंचायत च्या वतीने या गाळ्यांचा सार्वजनिक लिलाव रितसर झाला.ज्या व्यापाऱ्यांना अथवा गाळा भाड्याने पाहिजे आहे.त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बोली बोलण्यासाठी ५ हजार रुपये रक्कम भरून घेण्यात आली. जवळपास १० जन यात सहभागी झाले.बोली वाढत गेली. तसे एकमेकांचे आकडे ही वाढू लागले.एकाच गाळ्यासाठी एका चहाच्या टपरी वाल्याने ३०लाखाची बोली बोलून ही प्रक्रिया थांबविली.तर दुसऱ्या क्रमांकाची बोली ही २५ लाखांवर जाऊन पोहोंचली. हा प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थ ही थक्क झाले. महानगरात ही भाडे नसावे इतकी बोली ग्रामीण भागात बोलली जाते.याला म्हणायचे तरी काय..

रक्कम भरण्यासाठी दिली आठ दिवसांची मुदतया प्रकरणाची माहिती डोंगरपिंपळा गावचे ग्रामसेवक नागनाथ धीरे यांच्याकडे विचारली असता हा लिलाव आज सकाळी झाला.ज्या व्यक्तीने ३० लाखाची बोली बोलली.त्यांना ग्रामपंचायत कडे रक्कम जमा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.तर याच गळ्याला दुसरी मागणी २५ लाखांची आहे.असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडgram panchayatग्राम पंचायत