शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 18:58 IST

दोन महिला जेरबंद; चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंबाजोगाई - येथील बस स्थानकात महिलांचे दागिने चोरणार्‍या टोळीने उच्छाद मांडला होता. सततच्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत कसून तपास करत दागिने चोरणार्‍या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून दोन महिलांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई बसस्थानक येथे लग्न सराईच्या गर्दीचा फायदा घेवून महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे, पर्स मधील पैसे, दागिणे चोरीचे गुन्हे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला ६ गुन्हे दाखल होते. बसस्थानक येथे होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक  कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई, अनिल चोरमले यांनी शर्तीचे प्रयत्न करून अंबाजोगाई विभाग अंतर्गत पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.

सदर पथकांनी गुन्हे घडल्याचे ठिकाणचे सी.सी.टि.व्ही फुटेज, गोपनिय बातमीदार नेमुन, शर्थीचे प्रयत्न करून  मिराबाई दत्तात्रय काळे वय ४९ वर्षे रा. जायकवाडी सरकारी दावाखान्याचे पाठीमागे सोनपठे जि. परभणी,  पुजा उदयराज भोसले वय २१ वर्षे रा. पोंडुळ ता. सोनपेठ जि. परभणी,  रविद्र प्रकाश ऊंडानशिव व ४४ वर्षे रा. गंगाखेड जि. परभणी यांना अटक करून त्यांचेकडून पोस्टे अंबाजोगाई शहरच्या ४ गुन्हयातील चोरी गेलेले ६ तोळे सोने किमंती ३,३९,००००/- व नगदी रोख ५२०००/- रुपये असे एकुण ३,९१,०००/- (तीन लाख ऐक्यान्नव हजार) रुपयाचा माल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई, अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, चाँद मेंडके पोलीस उपनिरीक्षक पोस्टे अंबाजोगाई  अर्सुळ, घोळवे,  वडकर, नागरगोजे, चादर, लाड, सांळुके, तसेच पोह भास्कर केंद्रे, सचिन सानप, तेजस वाव्हळे यांनी केली आहे. भविष्यातही चोरी करणारे, गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमाननाऱ्या व्यक्ती विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे संकेत नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक बीड व अप्पर पोलीस अधिक्षक  कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी दिले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी