शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

३५ प्रवासी घेऊन राँगसाईडने जाणारी बस ट्रकला धडकली, सुदैवाने जीवितहानी नाही

By दिपक ढोले  | Updated: August 16, 2022 18:18 IST

याप्रकरणी ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी: चांगतपुरी येथून परतूरकडे ३५ प्रवासी घेऊन रॉंगसाईटने जाणारी बस ट्रकला धडकल्याची घटना परतूर तालुक्यातील आष्टी येथील वसंतराव नाईक चौकात मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी चांगतपुरीहून ३५ ते ४० प्रवासी घेऊन बस परतूरकडे जात होती. आष्टी शहरातील वसंतराव नाईक चौकात चालकाने बस रॉंगसाईडने टाकली. त्याचवेळी परतूरहून आष्टीकडे जाणाऱ्या ट्रकला बस धडकली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात ट्रक व बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसचालक सत्यनारायण हरिभाऊ खरात ( वय ५४), गोदावरी पंडितराव सवने (५० रा. चांगतपुरी ), मीना ख्वाजा कुरेशी (३२ रा. मेहकर) यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. हारूण शेख यांनी प्रथमोपचार केले.

घटनेची माहिती मिळताच, आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी ट्रकचालक अंकुशकुमार गुप्ता (२२ रा. जमुआ ता. मझोली, जि. सिंधी मध्यप्रदेश) याच्या फिर्यादीवरून बस चालक सत्यनारायण हरिभाऊ खरात याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार आर. आर. गौड हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड