शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

भूविकास बॅँकेतील बीडच्या ९४ कर्मचाऱ्यांचे साडेनऊ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:56 IST

अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.२४ जुलै २०१५ रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व भू विकास बॅँक अवसायनात काढून बंद केल्या. कर्मचा-यांचे देणे भागविण्यासाठी राज्यातील बॅँकांच्या मालमत्ता विक्री करणे व हस्तांतरीत करण्यासाठी मंत्री गट समिती नियुक्त केली होती. बॅँकेची मालमत्ती विक्री करताना ई - टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी उपसमितीने कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी बाजारदरानुसार मूल्यांकन करुन भूविकास बॅँकेकडून येणे असणा-या रकमा समायोजित न करता सदरची रक्कम भूविकास बॅँक कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी ती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला होता. यासही एक वर्षाचा कालावधी होऊनही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.बीड जिल्हा भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांची थकित पगार, ग्रॅच्युटी, रजेचा पगार व नुकसान भरपाई अशी एकूण ९ कोटी ५० लाख रुपये येणे आहे. ९४ पैकर १० ते १५ कर्मचारी मयत झाले असून त्यांच्या विधवा पत्नीकडे उपजीविकेसाठी कुठलेही साधन नसल्याने मोलमजुरी करुन आपल्या पाल्यांचा सांभाळ करावा लागत आहे. काही कर्मचा-यांना औषधोपचार न करता आल्याने प्राण गमवावे लागले. बीड जिल्हा कायम दुष्काळी असून रोजगारही मिळत नाही. शासनाने या बॅँकेचा निर्णय घेऊन ४ वर्षांचा कालावधी लोटला असून कर्मचाºयांना अद्याप काहीही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने ३१ जानेवारीपूर्वी ठोस निर्णय घ्यावा नसता कर्मचा-यांना सामूहिक आत्महत्येची परवानगरी द्यावी अशी मागणी तारामती सिरसट, सुभद्राबाई परबळे, रजिया बेगम जावेद नवाज, दैवशाला गोरे, वंदना वाघमारे, शे. सलीम, अशोक नागथई, शहादेव मिसाळ, भिवसेन जोगदंड, बाबासाहेब परजणे, ज्ञानोबा घोबाळे, शिवाजी राठोड, उत्तम केदार, भागवत मुरलीधर करडुले, ज्ञानदेव विधाते, अरुण लांडे, अनिल चौधरी, बाळनाथ घुमरे, व्ही. पी. परदेशी, जी. डी. नेलवाडकर, एस. बी. आवढाळ, एस. एस. खरात, जे. ई. नेटके, आर. एम. साळुंके आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी