शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:25 IST

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

बीड : जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.गुंडगिरी करुन दहशत निर्माण करणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशीर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिले. त्यानुसार अंबाजोगाई ग्रामीणचे उपनिरीक्षक एस.डी.भोकाणे यांनी परमेश्ववर उर्फ बाळासाहेब नारायण जाधव, जीवन मोहन अंधारे, युवराज माणिक चव्हाण व शेख मंजूर शेख यासीन (सर्व रा.घाटनांदूर ता. अंबाजोगाई) यांच्यासह उपनिरीक्षक एस.यु.जाधव यांनी शेख एजाज शेख इसाक, दगडू बापू शेरेकर, नागनाथ गोविंद लामतुरे (सर्व रा.घाटनांदूर) या दोन टोळ्यांविरुध्द मटका जुगाराचे गुन्हे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवले होते.याशिवाय गेवराईचे तत्कालीन पो.नि.दिनेश आहेर यांनी मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या अविनाश कल्याण धुरंधरे (रा.मादळमोही ह.मु.तेलगाव नाका, बीड) व लहू सुभाष हातागळे (रा.काळा हनुमान ठाणा, बीड) यांच्याविरुध्द प्रस्ताव तयार केला होता.घाटनांदूरच्या प्रस्तावाची अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी तर बीडमधील प्रस्तावाची उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी चौकशी करत या लोकांना हद्दपार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली.दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडCrime Newsगुन्हेगारी