शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:30 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत.

ठळक मुद्देशेतकरी सभासदांची गर्दी : दुष्काळी अनुदानाचे रोख स्वरुपात शाखेमार्फत वितरण; विम्याची रक्कम थेट खात्यात

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत. तसेच अनुदान आणि पीक विमा एकाही सभासदाच्या कर्ज खात्यात वर्ग केलेले नाही, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला, यात बीड जिल्ह्याचा समावेश आहे. शासनाने दुष्काळी योजना लागू केल्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४२८ कोटींचे दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे. शासनामार्फत हे अनुदान दोन ते तीन टप्प्यात आले असून, दोन किंवा तीन टप्प्यात दिल्यामुळे एका शेतकºयाचे दोन ते तीन याद्यांमध्ये नाव समाविष्ट आहे. मार्च २०१९ पासून टप्प्याटप्प्याने जवळपास ३७५ कोटी रुपये दुष्काळी अनुदान शासनाकडून बँकेच्या विविध शाखेत प्राप्त झाले असून, जिल्ह्यात ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांची संख्या आहे. दोन किंवा तीन टप्प्यात अनुदान प्राप्त झाल्यामुळे शेतकºयांची सभासद संख्या १२ ते १३ लाखांपर्यंत होत आहे.बँकेमार्फत २७५ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्रत्यक्ष रोख स्वरुपात शाखेमार्फत शेतकºयांना वितरीत केले आहे. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकºयांना प्राप्त ६५ कोटींचे अनुदान जानेवारी ते मार्च दरम्यान प्राप्त झाले तेही वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आॅनलाईन पद्धतीने पीक विमा हप्ता भरणा करण्यात आला होता. त्यामध्ये ज्या शेतकºयांनी जिल्हा बँकेचे बचतखाते क्रमांक दिले आहेत, त्या शेतकºयांच्या बचतखात्यावर उडीद, मूग, कापूस, तीळ, भुईमूग, तूर, बाजरी पिकांची नुकसान भरपाईची रक्कम ७० कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केली आहे. याचे जवळपास ५१ कोटी रुपयांचे रोख स्वरुपात वितरण बँकेने केल्याचे सारडा यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मिळणारे अतिवृष्टी अनुदान, दुष्काळी अनुदान, पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमा त्वरित वाटप करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित रकमा देखील त्वरित वाटप करण्याचे नियोजन करीत असल्याचे ते म्हणाले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये शेतकरी सभासदांची गर्दी होत आहे. काही शाखांमध्ये शाखाधिकारी, रोखपाल हे दोनच कर्र्मचारी आहेत. उपलब्ध शाखाधिकारी, कर्मचाºयांच्या माध्यमातूनच दुष्काळी अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई, विविध अनुदान, अतिवृष्टीच्या रकमा खात्यावर जमा करण्यात आल्याचे सारडा म्हणाले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, वसंत सानप, महादेव तोंडे, हिंदूलाल काकडे, परमेश्वर उजगरे, राडकर आदी संचालक उपस्थित होते.२० टक्के शेतकºयांचेच १५ अंकी बचतखाते बरोबरशासनाकडून बँकेकडे आलेले अनुदान जमा करण्यासाठी शेतकरी सभासदांच्या १५ अंकी खाते क्रमांकाची आवश्यकता असताना देखील प्राप्त अनुदान याद्यावर फक्त २० टक्के शेतकºयांचेच १५ अंकी बचतखाते क्रमांक बरोबर दिलेले आहेत.असे असतानाही तहसील कार्यालयातून आलेल्या दुष्काळी अनुदान याद्या शाखेने स्वीकारुन ज्या शेतकºयांच्या नावाने अनुदान आले, त्या शेतकºयांचे खाते क्रमांक शोधून त्यांच्या बँकेतील बचतखात्यावर दुष्काळी अनुदानाच्या संपूर्ण रकमा जमा करण्यात आल्याचे बँक अध्यक्ष सारडा यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज