रविवारी ३३६ तर त्यानंतर लागोपाठ सोमवारी २३९ आणि मंगळवारी २०७ जास्त कोरोनाबाधित आढळले. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार १९४६ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर २०७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक ५६, आष्टी तालुक्यात १७, बीडमध्ये सर्वाधिक ४२, धारूरमध्ये ८, गेवराईत ९, केजमध्ये ११, माजलगावात २५, परळीत १५, पाटोद्यात १२, शिरूरमध्ये ८ तर वडवणीत ४ नवे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ७९२ इतका झाला असून, २० हजार ६६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ६०३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.