शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वांगीत ७५ विद्यार्थ्यांना मटकीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:35 IST

बीड : तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना मटकीतून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अन्न व औषध प्रशासनाने शाळेला तत्काळ भेट देऊन नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. वांगी येथील जि. प. शाळेतील ...

बीड : तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना मटकीतून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अन्न व औषध प्रशासनाने शाळेला तत्काळ भेट देऊन नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. वांगी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनाही गुरुवारी दुपारी १२ वाजता मटकी देण्यात आली. मटकी खाताच काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले, तर काहींना मळमळ होऊ लागली. हा प्रकार शिक्षकांना समजताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सर्व डॉक्टर व कर्मचारी एकत्र करीत मुलांवर उपचार सुरु केले. काहींना अपघात विभागात, तर काहींना वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार समजताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. तोपर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत वांगी येथील जि. प. शाळेत धाव घेतली. तेथील मटकी व इतर धान्याचे त्यांनी नमुने तपासणीसाठी घेतल्याचे सांगण्यात आले. 

ज्या मुलांना विषबाधा झाली नव्हती परंतु खरबदारी म्हणून त्यांनाही रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्याही तपासणी केल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

मुलांना मटकीचा आहार देण्यात आला होता. आम्ही नियमित तपासणी करतो. परंतु हा प्रकार कसा घडला हे समजलेच नाही. काही मुलांच्या पोटात दुखू लागल्याचे समजातच सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.- एस. एस. तिडके, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, वांगी

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा