शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मुंडे हॉस्पिटलवर ६० जणांच्या महापथकाची धाड; रात्रभर झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:57 IST

येणाऱ्या रुणांना इंजेक्शन द्यायचे आणि रोग बरा होतो, असे सांगून संशियत रु ग्णांना तो दिलासा देत असे.

ठळक मुद्देविविध कलमांनुसार गुन्हा दाखलकोरोनासदृश रुग्णांवरही करायचा उपचार

- संजय खाकरे 

परळी (जि. बीड) : पाच  विभागांतील ६०  जणांच्या महापथकाने डॉ. सुदाम मुंडे याच्या दवाखान्याची झाडाझडती घेतली. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. या पथकात आरोग्य विभागातील वैद्यकीय आधिकारी, सात कर्मचारी, दोन पोलीस निरीक्षक, ३० पोलीस अधिकारी, कर्मचारी,  उपजिल्हाधिकारी यांच्यासह महसूलचे १५ अधिकारी, कर्मचारी, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक आणि महावितरणचे चौघे होते.  

डॉ. सुदाम मुंडे याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात औषधसाठा, पोर्टेबल एक्स-रे मशीन, गर्भपातासाठी आवश्यक असणारी उपकरणे, नेबुलाईझर व आॅक्सिजनच्या  प्रत्येकी दोन मशीन  आढळून आल्या. पथकाने हे सर्व साहित्य सील केले. तसेच यावेळी चार रु ग्ण उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे दिसून आले.   

कोरोनासदृश रुग्णांवरही करायचा उपचारकुठलीही परवानगी नसताना संशयित रुग्णांची तपासणी करून इंजेक्शन द्यायचे. त्यानंतर गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन द्यायचे. मात्र, त्यावर हॉस्पिटलचा उल्लेख नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून  कोरोनासदृश  रु ग्णांवरही त्याने उपचार सरू केले होते.  मास्क वापरण्यास त्याचा विरोध होता. येणाऱ्या रुणांना इंजेक्शन द्यायचे आणि रोग बरा होतो, असे सांगून संशियत रु ग्णांना तो दिलासा देत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील  रुग्णांची गर्दी वाढली होती.

पथकात कोण होते?पथकात उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन  पाटील, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे, परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, प्रमुख डॉ. बालासाहेब मैड, अन्न व औषध निरीक्षक डोईफोडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.या ६० जणांच्या पथकाने रात्रभर सुदाम मुंडेच्या रुग्णालयाची झाडाझडती घेतली. 

विविध कलमांनुसार गुन्हा दाखलबेकायदेशीरपणे प्रॅक्टिस केल्याप्रकरणी शनिवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री छापा मारून कारवाई करण्यात आली. डॉ. सुदाम मुंडेविरुद्ध इंडियन मेडिकल काऊन्सिल अ‍ॅक्ट १९५६ चे १५(२), महाराष्टÑ मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट १९६१ चे कलम ३३(२) आणि भादंविचे कलम ३५३, २६९, २७०, २७८, ४१९, ४२०, १७५, १७९, ५०४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(बी), साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम २, ३, ४ वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ३, ४, ५ मुंबई सुश्रूषा नोंदणी कायदा १९४९ कलम ३ (२) प्रमाणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर