बीड : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ५७ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ६५५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ५९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये अंबाजोगाई १९, बीड २१, आष्टी ६, धारुर १ व गेवराई, माजलगाव, शिरूर, केज आणि परळी तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ८५५ एवढी झाली असून, पैकी १७ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:42 IST