शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ग्रा.पं.च्या ५६६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर ...

ठळक मुद्देतहसीलदारांकडून जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या होत्या. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवाराने रोज व शेवटी संपूर्ण निवडणूक खर्चाच्या हिशेबाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते. तालुक्यात पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी ४३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली त्यापैकी ३०० उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला तर १३२ उमेदवारांनी हिशेब सादर केला नाही.

ग्रामपंचायत सदस्यासाठी २११६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते यापैकी १६८१ उमेदवारांनी हिशेब सादर केला तर ४३४ जणांनी हिशेब सादर केलाच नाही. सरपंच व सदस्य पदासाठी उभे असलेल्या ५६६ उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याने तहसीलदार संतोष रुईकर यांनी नोटीसा देऊन त्वरीत हिशेब देण्याचे सांगितले होते. परंतु नोटीसा देऊनही हिशेब सादर केला नसल्याने या उमेदवारांविरूद्ध निवडणूक नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे.

  • अपात्रता किंवा निवडणुकीस बंदी

निवडून आलेल्या, बिनविरोध विजयी झालेल्या व पराभूत उमेदवारास निकालानंतर एक महिन्याच्या कालावधीत आपल्या निवडणूक खर्चाचा संपूर्ण हिशेब निवडणूक आयोगाला सादर कारणे बंधनकारक असते. नोटीसा देऊनही हिशेब सादर न करणाºया उमेदवारांवर जिल्हाधिकारी कारवाई करु शकतात. निवडूण आलेल्या उमेदवार अपात्र ठरु शकतो तर पराभूत उमेदवारास पुढील निवडणूक लढविण्यास बंदी केली जाऊ शकते.

वरिष्ठांकडे अहवाल पाठवला

नोटीस देऊनही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. हा निवडणूक नियमाचा भंग केल्याने या उमेदवारांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.-संतोष रूईकर,तहसीलदार, अंबाजोगाई