शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बीड जिल्ह्यात पासिंगअभावी ५४० ट्रक उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : केवळ पासिंग नसल्याने जिल्ह्यातील ५४० ट्रक जागेवरच उभे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

ठळक मुद्दे ‘एआरटीओ’ कार्यालयाचा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केवळ पासिंग नसल्याने जिल्ह्यातील ५४० ट्रक जागेवरच उभे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ट्रक मालक, चालकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रक उभ्या असल्याने वाहनांसाठी कर्ज घेतलेल्या बँकेचे हप्ते भरणेही मुश्किल झाले असून आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे संघटनेने सांगितले. अधिका-यांच्या मनमानी कारभारविरोधात संघटना आक्रमक झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जवळपास दोन हजार ट्रक (दहा टायर व त्यापेक्षा जास्त) आहेत. या सर्व ट्रक मालवाहू असून मालकांनी बँकेचे कर्ज, फायनान्स करून घेतलेल्या आहेत. एका ट्रकचा किमान ५० हजार रूपये हप्ता महिन्याला भरावा लागतो. परंतु मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ५४० ट्रक पासींगअभावी जागेवरच उभे आहेत.

मालक, चालक कार्यालयात गेल्यावर आमच्याकडे वेळ नाही, ट्रॅक नाही, असे कारणे सांगून येथील ‘निकम्मे’ अधिकारी वेळ काढून नेत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे ट्रकमालक वैतागले आहेत. सोमवारी त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आरटीओ कार्यालयातील बेजबाबदार कारभार कशाप्रकारे चालतो, याचे वाभाडे काढले.यावेळी त्यांनी निष्क्रीय अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर सडकून टिका केली.पत्रकार परिषदेला संघटनेचे सरचिटणीस फैय्याज खान, सय्यद मुस्तफा, गणेश नलावडे आदींसह इतरांची उपस्थिती होती.

  • कामे सोडून हप्ते घेण्यात व्यस्त

कार्यालयात गेल्यावर आम्हाला वेळ नाही, असे वेगवेगळे कारणे सांगितले जातात. परंतु गाड्या अडवून त्यांच्याकडून हप्ते घ्यायला अधिकाºयांना वेळ असतो, अशी टिका संघटनेचे फैय्याज खान यांनी केली. वेळ पडली तर या ‘निकम्म्या’ अधिकाºयांचे कारणामे पुराव्यांसहीत देऊ, असेही खान यांनी सांगितले.

  • १४ डिसेंबरला रास्ता रोको

वाहनांची नोंद न होणे, प्रमाणपत्र वेळेवर न मिळणे, अधिकाºयांकडून होणारी अडवणूक आदींमुळे मालक, चालक वैतागले आहेत.या विरोधात १४ डिसेंबर रोजी संघटनेच्यावतीने बायपासवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचेही संघटनेचे सरचिटणी फैय्याज खान यांनी सांगितले.