शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:37 IST

धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळला ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे.

स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळा बाजार होत असल्याचे समोर आले होते. याला आळा घालण्यासाठी वितरण व्यवस्था आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी सर्व शिधापत्रिका धारकांची व कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन आधार नोंदणी करण्यात आली. ग्राहकांना ई-पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी स्वस्त धान्य पुरवठा करणा-या दुकानदारांना केल्या होत्या. मात्र, या सूचनेला बासनात गुंडाळून ठेवत स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापरच केला नाही.

ही बाब जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या निदर्शनास अल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याची नोटीस या दुकानदारांना दिली आहे. एप्रिल महिन्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी वितरण असणा-या दुकानांना वितरण वाढवण्याच्या सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच जर वितरण वाढले नाही तर कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

ई-पॉस पावतीचा ग्राहकांनी धरावा आग्रहधान्य वितरण केल्यानंतर ई-पॉस मशिनद्वारे पोचपावती मिळते, शिधापत्रिका धारकांनी धान्य घेतल्यानंतर ही पोचवापवती घेण्याचे व दुकानदारांनीही देण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिका-यांनी केले आहे. पोचपावती न देणा-या दुकानदारांची लेखील तक्रार जिल्हा पुरवठा कार्यालय किंवा तहसिल कार्यालयात करावी.

ई-पॉस मशिनमुळे पारदर्शकतापुरवठा विभागामधून स्वस्त धान्यांचा होणार काळा बाजार ई-पॉस मशिनमुळे थांबणार आहे. तसेच पारदर्शक व सुळीत कारभार होण्यास मदत होणार आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून जेवढे धान्य वाटप केले जाईल त्याचा संपुर्ण डेटा संग्रहीत केला जात आहे. त्यामुळे धान्य काळ््या बाजारत विकण्यावर प्रतिबंधयेईल व पुरवठा विभागातील धान्याचा अपहार थांबेल.

कठोर कारवाई करुया महिन्यात ई-पॉस मशिनद्वारे ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरण करणा-या स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच ई-पॉसची पावती दिली नाही किंवा याविषयी तक्रारी आल्या तरी देखील कठोर कारवाई केली जाईल. अशा सूचना स्थानिक पातळीवरील कार्यालयांना दिल्या आहेत.- ए. टी. झिरवाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडा