शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:27 IST

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ...

ठळक मुद्देमदत तोकडी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित, ‘उभारी’ ची बैठक नाही

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी एप्रिल महिना अखेरपर्यंत ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी दुष्काळी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण पुढे आले आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थती व प्रशासनाची उदासिनता यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना कमी पडत आहेत. मागील दोन वर्ष सलग कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच कापसावर बोंडअळीचा प्रदुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचीत सापडले आहेत. तसेच कर्ज माफ केल्याची घोषणा शासनाने केली. मात्र, अद्यापपर्यंत अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांच्या नावे शेतीसाठी कर्ज दिसत आहे. तसेच नवीन कर्ज देण्यास बँकांकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचण व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची झालेली अवस्था तसेच हाताला काम नसल्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य असल्याचे दिसून येत आहे. ते दूर करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत.आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने ‘उभारी’ योजना सुरु केलेली आहे. यामधून आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला विहीर, घरकुल, शेतीसाठीच्या विविध योजना देण्यात येतात. मात्र, दोन महिन्यांपासून उभारीची बैठक झाली नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.मागील वर्षी १९१ शेतकरी आत्महत्यामगील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १९१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी १५० शेतकरी मदतीसाठी पात्र झाले होते तसेच त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे.तसेच उभारी अतंर्गत विविध योजना देखील दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील अधिकाºयांकडून कागदपत्रे देण्यासाठी योग्य सहकार्य केले जात नाही.सदरील कारणास्तव अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून सांगण्यात आले.अनुदानाचे तात्काळ वाटप करण्याची मागणीदुष्काळी अनुदानाची रक्कम व शासनाकडून पाठवण्यात आलेले विविध अनुदानाची रक्कम जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने वाटप केली जात नाही.ही गंभीर बाब असून प्रशासनाकडून डीडीसी बँकेवर कारवाई करुन तात्काळ अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी शेतकºयांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या