शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कचऱ्यापासून ५० टन गांडूळ खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:19 IST

बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी आदर्श ठरू पहात आहे.

ठळक मुद्देपालिकेची संकल्पना : बीड शहरातील चार उद्यानांमध्ये फुलली हिरवळ; स्वच्छतेसाठी केले उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी आदर्श ठरू पहात आहे.स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत ‘स्वच्छ व सुंदर शहर’ करण्यासाठी बीड पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. शहर हागणदारीमुक्त करण्याबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकेने कठोर परिश्रम घेतले. स्वच्छता विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. तरीही मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी योग्य नियोजन करून वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जाते. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व विभाग स्वच्छेतेसाठी रस्त्यावर असतात. असे असले तरी नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत आहे.दरम्यान, शहरात निघणाºया ओला कचºयापासून गांडूळ खत तयार करण्याचा निर्णय घेतला. याला यश आले आहे.आतापर्यंत तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती करण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. एवढेच नव्हे तर याच खतापासून बीड शहरातील जोशी उद्यान, यशवंत उद्यान, विद्यानगर पूर्व उद्यान, प्रियदर्शनी उद्यानातील बाग फुलविली जात आहे. यामुळे सर्वत्र हिरवळ पसरल्याचे दिसते.मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, भारत चांदणे, रमेश डहाळे, महादेव गायकवाड, ज्योती ढाका ही टिम यशस्वी काम करत आहे.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्न