शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बीड मतदारसंघात ६ मतदान केंदे्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:45 IST

बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे.

ठळक मुद्दे१० केंद्रांवर स्टील कॅमेरे ठेवणार नजर : ३८ केंद्रांची वेबकास्टिंग; पहाटे साडेपाचला मॉकपोल

बीड : बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे. निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून १२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना निवडणूक मतदान व मोजणीपर्यंतच्या काळात मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात वावरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी ही माहिती दिली.बीड विधानसभा मतदार संघात १ लाख ७८ हजार ७६८ पुरुष तर १ लाख ५६ हजार ३७९ स्त्री असे ३ लाख ३५ हजार १४७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात ३ मतदार तृतीयपंथी आहेत. मतदार संघात एक सखी व एक मॉडेल मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामकाजासाठी २२४४ कर्मचारी, अधिकारी नियुक्त केले असून त्यांचे तीन वेळा प्रशिक्षण झाले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ते नियुक्त केंद्रांवर पोहोचले.आतापर्यंत सार्वजनिक ठिंकाणी विद्रुपीकरण केल्याप्रकरणी २ तर पैसे वाटल्याच्या प्रकरणा १ असे आचारसंहिता भंगाचे ३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे टिळेकर म्हणाले.दरम्यान, मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी तसेच साहित्य पोहोचले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार २१ आॅक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता मॉकपोल होऊन ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगितले.मतदार संघात ३७४ मतदान केंद्र असून १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या भागात ८ सहायकारी केंद्र करण्यात आले आहेत. मतदानासाठी ३७४ सीयु, ३७४ व्हीव्हीपॅट तर ११२२ बीयू उपलब्ध करण्यात आले आहेत. ७१ इव्हीएम राखीव ठेवले आहेत. आचारसंहिता पालन तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान ३ भरारी पथकांची नजर राहणार आहे, तसेच व्हिडीओ चित्रीकरण करणारे पथक नियुक्त केले आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड