शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा, बिल्डरसह नगररचनाकारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:46 AM

फ्लॅट घेण्यासाठी करारनामा व ५ लाख रुपये देऊन देखील ताबा व पैसे देण्यास नकार दिल्यामुळे बिल्डरसह सहायक नगर रचनाकारावर बीड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्लॉटची जागा वाढली  : पोलिसांनी योग्य तपास केला तर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

बीड : फ्लॅट घेण्यासाठी करारनामा व ५ लाख रुपये देऊन देखील ताबा व पैसे देण्यास नकार दिल्यामुळे बिल्डरसह सहायक नगर रचनाकारावर बीड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बिल्डर उमर मुश्ताक फारोखी व नगरपरिषदेचे सहायक नगर रचनाकार एजाज खान अशी आरोपींची नावे आहेत. सय्यद फिरोज सय्यद रहेमतुल्ला (रा. बीड) हे औरंगाबाद येथील विमानतळावर शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. २०१५ साली त्यांनी बीडमध्ये फ्लॅट खरेदीचा व्यवहार केला होता. ३० जून २०१५ रोजी त्यांनी झमझम कॉलनीत फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी उमर मुश्ताक फारोखी यांना ५ लाख रुपये देऊन १०० रुपयांच्या बँडवर नोटरी करुन करारनामा केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत फ्लॅटचा ताबा देण्याचे त्यात नमूद होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही सय्यद फिरोज यांना उमर फारोखी याने फ्लॅटचा ताबा देण्यास नकार दिला. त्यानंतर फिरोज यांनी पैसे परत देण्याची मागणी केली तेव्हा पैसे देण्यास देखील मुश्ताक फारोकी याने टाळाटाळ केली.त्यानंतर अनेक वेळा ५ लाख परत देण्याची मागणी सय्यद फिरोज सय्यद महेमतुल्ला यांनी केली मात्र, त्यांना पैसे व फ्लॅट देण्यास वेळोवेळी नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. न.प.चे सहायक नगर रचनाकार एजाज खान तौफिकयार खान याच्या संगनमताने उमर मुश्ताक फारूखी याने खोटे दस्ताऐवज तयार करुन अनेकांना गंडा घातल्याचे सय्यद फिरोज यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.क्षेत्रफळ वाढले, योग्य तपासाची मागणीउमर फारुखी याने खरेदी केलेल्या भूखंडाच्या खरेदीखतावर एकूण क्षेत्रफळ ९५७. १२ चौरस मिटर एवढे आहे. मात्र, पालिकेने त्यास १०७५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा पीटीआर दिला. यावरुन न.प.मधील अधिकारी पैसे खाऊन कागदोपत्री क्षेत्रफळ वाढवून देतात, तसेच सहायक नगररचनाकार अधिकऱ्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य कार्यवाही करुन तपास केला तर अशा प्रकारे नगररचनाकाराने किती ठिकाणी क्षेत्रफळ वाढवले आहे, हे समोर येईल.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी