या लाभार्थ्यांना दोन म्हशी किंवा दोन गायी देण्यात येणार आहेत ज्याची किंमत ८० हजार रुपये इतकी असणार आहे. दोन म्हशी किंवा दोन गायी या ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत. लाभार्थ्यांनी निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करून ४० हजार रुपये पंचायत समितीच्या कृषी आणि पशूसंवर्धन विभागात भरावयाचे आहेत. त्यानंतर या लाभार्थ्यांना महा डीबीडी प्रणालीद्वारे ८० हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा लाभार्थी त्याच्या पसंतीने दोन गायी किंवा दोन म्हशी घेण्याची मुबा देण्यात आलेली आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील ३ हजार ६८१ लाभार्थी पात्र झाले होते. याची सोडत सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये ‘अंडर व्हिडिओ’ करण्यात आली. त्यामुळे लवकरच ज्या ४७० लाभार्थ्यांना हे दुधाळ जनावर मिळणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंर्धंन विभागाकडून करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून ४७० जणांना मिळणार दुधाळ जनावरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST