शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कडा येथील २३ गावांच्या ४० हजार लोकसंख्येची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:42 IST

कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र  गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे.

ठळक मुद्देकडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो एवढ्या गावांसाठी बोटावर मोजण्याइतक्या कर्मचा-यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बीड : कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र  गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. एवढ्या मोठ्या गावांची पाटीलकी अवघ्या ५-६ कर्मचा-यांवर असल्यामुळे मलईदार धंद्यांना अच्छे दिन आलेत. तर दुसरीकडे सामाजिक शांतता धोक्यात दिसत आहे. 

आष्टी तालुक्यात कड्याची बाजारपेठ सर्वांत मोठी असून, बाजार समिती, विविध बँका, शाळा, महाविद्यालय यांची संख्या अधिक असल्याने दररोज २०-२५ गावांचा नियमित संपर्क असतो. मात्र, एवढ्या मोठ्या गावाच्या पोलीस चौकीत फक्त एका अधिका-यासह पाच पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कारभार रामभरोसे चालतो. रविवारी कड्याचा आठवडी बाजार भरतो. त्यादिवशी हमखास बाजारात वाहन, मोबाईल, महिलांच्या पर्सच्या चो-या होतात. एवढं होऊनही वरिष्ठांना परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही. सध्या २३ गावांसाठी असलेली कर्मचा-यांची अपुरी संख्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक ठरत आहे.

पोलीस चौकीअंतर्गत  २२ गावे आहेत, त्यांची लोकसंख्या ४० हजार असल्याचे कळते, कड्यासह शिराळ, निमगाव चोरा, रूई नालकोल, टाकळी, दोन शेरी, घुमरी, पिंपरी, केरूळ, खिळद, लिंबोडी, धिर्डी, खाकळवाडी, पाटण, सांगवी आदी गावे आहेत. चौकीत सध्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह अवघे पाच-सहा कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या गावांसाठी बोटावर मोजण्याइतक्या कर्मचा-यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता खाकीचा धाक, अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच आता आष्टी तालुक्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पोलीस चौकीत चार-पाच कर्मचारी वाढवून दिल्यास चोरट्यांच्या दहशतीखाली वावरणा-या ग्रामस्थांना मोठा आधार मिळणार आहे. पोलीस चौकीमध्ये कर्मचा-यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पोलीस अधीक्षकांनीच लक्ष द्यावेविस्तारलेलं गाव म्हणून कडयाची बाजारपेठ तालुक्यात परिचित आहे. येथील चौकीतर्गत तेवीस गावे,पंचवीस कि.मी.परिसर,चाळीस हजाराच्या आसपास लोकसंख्या असतानाही अवघे पाच-सहा पोलिस कर्मचारी चौकीत कार्यरत आहेत.त्यामुळे सामाजिक शांततेला ठेच पोहचत आहे. एवढ्या मोठ्या गावांचा कारभार हाकताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे.त्यातच पुन्हा कडा चौकीला स्वतंत्र वाहन नसल्याने  या पोलीस चौकीला स्वतंत्र वाहन नसल्याने रात्री-अपरात्री काही अनुचित घटना घडल्यावर पोलिसांना  हातात दांडकं घेऊन स्वत:चे पेट्रोल टाकून दुचाकीने घटनास्थळापर्यंत जावे लागते.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेBeedबीड