शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील ८१ पैकी ३३ औषध निरीक्षक होणार सहायक आयुक्त; आता औषधांची नमुने कोण घेणार?

By सोमनाथ खताळ | Updated: February 17, 2025 12:35 IST

नवीन भरतीचा प्रश्न ऐरणीवर! राज्यभर केवळ ४८ जणच फिल्डवर राहतील. मग बोगस औषधी तपासणार कोण, हा प्रश्न आहे.

बीड : अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून बोगस औषधी वितरणाचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांच्या औषधांची तपासणी करण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या. परंतु याचे नमुने घेण्यासाठी औषध निरीक्षकच अपुरे समाेर आले आहे. सध्या राज्यात २०० पैकी ८१ निरीक्षक कार्यरत आहेत. त्यातील ३३ जणांना आठवडाभरात पदोन्नती मिळून ते सहायक आयुक्त होणार आहेत. त्यामुळे केवळ ४८ जणच फिल्डवर राहतील. मग बोगस औषधी तपासणार कोण, हा प्रश्न आहे. त्यामुळे नवी भरती करणे आवश्यक आहे.

कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेस या कंपनीने ८५ लाख गोळ्यांचा राज्यभरात पुरवठा केला होता. यात अंबाजोगाईसह अनेक ठिकाणची औषधी बोगस आढळली होती. त्यानंतर औषध प्रशासनाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात प्रत्येक शासकीय रुग्णालयातून औषध नमुने घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका निरीक्षकला महिन्याला १० अनौपचारिक नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु यासाठी राज्यात मनुष्यबळच नसल्याचे समोर आले. उपलब्ध असलेल्या निरीक्षकांनाच इतर जिल्ह्यांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे.

मराठवाड्यात राहणार दोनच निरीक्षकमराठवाड्यात औषध निरीक्षकांची २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सात कार्यरत आहेत. आता यातीलही पाचजण पदोन्नतीने सहायक आयुक्त होणार आहेत, तर सध्या सहायक आयुक्तांची आठ पदे असून, छत्रपती संभाजीनगरमधील झोन १ व २ येथेच कार्यरत आहेत. इतर सहा पदे रिक्त आहेत.

मेडिकलची तपासणी कशी होणार?एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एका निरीक्षकाला महिन्याला १० मेडिकलची तपासणी आणि तीन नमुने घेण्याचे उद्दिष्ट होते. परंतु बोगस औषधीचे प्रकरण समोर आल्यानंतर शासकीय रुग्णालयातील १० नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु ते घेण्यासाठी निरीक्षकच नसल्याचे समाेर आले आहे. मग शासकीयच नव्हे तर खासगी मेडिकलची तपासणी कशी होणार, हा प्रश्न आहे.

शासन भरती कधी करणार?औषध निरीक्षकांची पदे ही एमपीएससीमार्फत भरली जातात. परंतु मागील काही वर्षांपासून या पदांची भरतीच झालेली नाही. यासंदर्भात औषध प्रशासनाचे सह आयुक्त डी.आर. गहाणे यांना संपर्क केला, परंतु त्यांनी व्यस्त असल्याचा मेसेज पाठविला. त्यामुळे बाजू समजली नाही.

अशी आहे आकडेवारीपदे - मंजूर - कार्यरतसहायक आयुक्त - ६७ - २५औषध निरीक्षक - २०० - ८१

टॅग्स :medicineऔषधंMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड