शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची बोंडे खाल्ल्याने कुंबेफळला ३० मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:43 IST

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ठळक मुद्देतीन लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अंबाजोगाई येथील नारायण बाळू गवळी, किसन अंकुश चौरे, रामचंद्र व्यंकट गायके आणि कुंबेफळ येथील सुधाकर खंडू हेडे या चार मेंढपाळांनी त्यांच्या कळपातील एकूण ६०० मेंढ्या सोमवारी सायंकाळपासून कुंबेफळ येथील तळ्याच्या परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. यातील काही मेंढ्यांनी बोंडअळीच्या प्रादुभार्वामुळे खराब झालेली कापसाची शेतातून उपटून बांधावर टाकलेली बोंडे आणि पाला खाल्ला.दरम्यान, कुंबेफळ येथील प्रमोद भोसले, सुनील आडसूळ, प्रकाश तोडकर, अंकुश डीवरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मेंढपाळास मदत केली. या मेंढपाळांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचारमंगळवारी पहाटेपासून एकामागोमाग एक मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू झाले. आतापर्यंत ३० मेंढ्या दगावल्या असून बाकी अत्यवस्थ आहेत. याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे, डॉ. गुट्टे, डॉ. अनिल केंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचार सुरू केले. बाधित मेंंढ्यांचे प्रमाण पाहता आणखी मेंढ्या दगावण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तांदळे यांनी व्यक्त केली.