शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३७ कोटींच्या इमारती यंत्र, साहित्याअभावी धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:58 IST

अंबाजोगाई येथे स्त्री रुग्णालय १७ कोटी रुपये खर्चून, तर वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र हे २० कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. मात्र, केवळ यंत्र सामग्री आणि साहित्य नसल्याने या दोन्ही इमारती धूळखात आहेत.

ठळक मुद्देउदासिनता : अंबाजोगाई येथील स्त्री रुग्णालय व वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्राचा प्रश्न ऐरणीवर

बीड : अंबाजोगाई येथे स्त्री रुग्णालय १७ कोटी रुपये खर्चून, तर वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र हे २० कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. इमारतीचे कामही दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ यंत्र सामग्री आणि साहित्य नसल्याने या दोन्ही इमारती धूळखात आहेत. यंत्र व साहित्य उपलब्ध करुन देण्यास आरोग्य विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.अंबाजोगाई येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व १०० खाटांचे वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र मंजूर झालेले आहे. दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि इतर कामेही पूर्ण झालेली आहेत.जवळपास दीड वर्षांपूर्वीच सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. कामे सुरु असतानाच बीड आरोग्य विभागाने आवश्यक असणारी यंत्र सामग्री आणि साहित्याची मागणी केली. याचा पाठपुरावाही केला. मात्र, दीड वर्ष उलटूनही अद्याप यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. एकीकडे श्रेयवादासाठी लढणारे लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या प्रश्नावर शांत आहेत. त्यामुळे वरिष्ठ कार्यालय यावर गांभीर्याने विचार करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

पाठपुरावा सुरुच - उपसंचालकदोन्ही रुग्णालयाचे पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. कुशल, अकुशल पदभरतीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल. यंत्र व साहित्य खरेदीसाठी आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरुच आहे. इतर रुग्णालयाला उपलब्ध झालेले थोडे जरी साहित्य मिळाले तरी आम्ही आमची सेवा सुरु करणार आहोत. लवकरच ते उपलब्ध करु.- डॉ.एकनाथ मालेउपसंचालक, आरोग्य सेवा लातूर

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलfundsनिधी