शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

माजलगावात २१ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कर्नाटक राज्यातून परभणी व सोलापूरकडे गुटखा घेऊन जाणारा टेम्पो दिंद्रुड पोलिसांनी पकडला. यामधील तब्बल ...

ठळक मुद्देपोलीस व अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : कर्नाटक राज्यातून परभणी व सोलापूरकडे गुटखा घेऊन जाणारा टेम्पो दिंद्रुड पोलिसांनी पकडला. यामधील तब्बल २१ लाख रुपयांचा गुटखाही जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली. माहिती समजताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी दिंद्रुडला धाव घेत पंचनामा करून दोघांविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दिंद्रुड पोलिसांकडून मंगळवारी रात्री तेलगाव-माजलगाव दरम्यान गस्त घातली जात होती. एवढ्यात एक टेम्पो (एमएच १३ सीयू ०८६९) भरधाव वेगाने जाताना दिसला. पोलिसांना याबाबत संशय आला. त्यांनी टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले. परंतु त्याने वेगाने टेम्पो पळविला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून टेम्पो नित्रूडजवळ अडविला. तपासणी केली असता टेम्पोमध्ये मागील बाजूस गव्हाच्या पिठाच्या गोण्या दिसल्या. पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी टेम्पोमध्ये जाऊन तपासणी केली असता गोण्याच्या मागे गुटख्याने भरलेले पोते दिसले.

त्यांनी याबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकारी व अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर, ऋषिकेश मरेवार यांनी सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांच्या परवानगीने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून पकडलेल्या गुटख्याचा व टेम्पोचा पंचनामा केला.

याप्रकरणी टेम्पो चालक संतोष नागरगोजे व नाथराव नागरगोजे यांच्याविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सय्यद आसिफ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार युवराज टाकसाळ, कानदास बनसोडे, ए.एस.आय.शेख शब्बीर यांनी केली.